साधारण २००६ चा काळ । अग तू ओर्कुट वर आहेस का? आहेस न मग मला Add कर ना सगळी भावंडे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी एका वेळी भेटतील अस ठिकाण म्हणजे Orkut! अस समीकरण झाल होत. जीवनातील लहान सहान गोष्टींचे देखील शेयारिंग त्यामुळे वाढीला लागल होतं . एका क्षेत्रातील लोक एकत्र येण्याकरिता वेग वेगळ्या Community , Orkut वर तयार केल्या जात होत्या विविध विषयांवरची माहिती सहज शेयर होऊ लागली होती . खरतर घराघरात इंटरनेट येण्याच Orkut एक मुख्य कारण होत असं म्हणायला हरकत नाही . आज सकाळी अचानक Orkut चा मेल पाहून अश्च्यार्य वाटलं . आणि ते Shut down होणार हे वाचून पुन्हा एकदा लोग इन करायचा मोह झाला . जुने Scraps आणि फोटो , जुन्या Communities वरची पोस्टिंग वाचून मन पुन्हा भूत काळात रमून गेलं . अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . नवीन ओळखी झाल्या ज्या आजही टिकून आहेत किंबहुना मैत्री दृढ झाली आहे .आजही ती माणस फेसबुक च्या माध्यमातून संपर्कात आहेत पण माध्यम बदलल आणि नाविन्य हि संपलं आहे . हळू हळू फेसबुक ला सुधा माणस कंटाळू लागली आहेत . प्रत्येक गोष्ट जी जन्माला येते तिचा शेवटही होतोच या तत्वाने आज ओर्कुट चा हि शेवट होताना आपण पाहत आहोत . असा शेवट करतानाही आपल्या चाहत्यांच्या भावनांचा आणि मनाचा विचार करत Orkut ने Data Archive करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे ज्या योगे आपण आपल्या जुन्या आठवणी फाईल मध्ये साठवून ठेवू शकतो . A Farewell to Orkut या विषयाचा मेल काही दिवसातच तुमच्या पर्यंतही पोचेल आणि तुम्हालाही भूत काळातील आठवणीत घेऊन जाईल या बद्दल मला खात्री आहे . सप्टेंबर २०१४च्या ३० तारखेला तुम्हाला तुमच शेवटच Scrapलिहिता येईल आणि सप्टेंबर २०१६ पर्यंत तुमचा Data Archive करून घेता येईल चला तर तयार व्हा आपली भुली बिसरी यादे ताजा करण्या साठी आणि त्यांच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी , जाता जाता ओर्कुट ला मनापासून धन्यवाद!