नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच
अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर किती मौज येईल !आज शहरी जीवनात जगताना मुलांना आंब्याच्या वनाची आणि नाचणाऱ्या मोराची पुसटशी कल्पना करता येणहि फारच दुर्मिळ आहे . ज्या बच्चे कंपनीला कोकणातले आजोळ असेल किंवा गावी राहणारे आजी आजोबा असतील त्यांनी मोर नाही तरी आंब्याचे बन नक्की पहिले असेल पण गाव नसेल किंवा गावी आजोळ नसेल तरी या सर्वाचा निर्भेळ आनंद मुंबई आणि पुण्यातील लोकांना घेणे आता सहज शक्य झाले आहे .
मुंबई आणि पुण्या पासून जवळच "मोराची चिंचोली " या गावी फेरफटका मारलात तर हे सहज शक्य आहे . जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचा सुखद अनुभव घेत घेत , वाहणारे निर्झर आणि हिरवळ याचा आस्वाद घेत घेत आपण मोराच्या चिंचोलीला येउन कधी पोचतो हे काळतही नाही . वाटेत दिसणारे मेंढपाळ आणि भली मोठी मेंढ्यांची झुंड वारंवार तुम्ही मुंबई सोडून छानश्या खेडेगावा कडे निघाले आहात याची साक्ष देतात .
शुद्ध हवा , प्रदूषण रहित गाव आणि सुखद वातावरण मनाला मोह पाडते . हा प्रदेश तसा कमी पावसाचा असल्याने ठराविक पिक घेतली जातात पण आत्ता गेलात तर डाळींबाच्या ,केळ्याच्या बागा फुललेल्या दिसतात
. बाजरीची शेती दिसते . आणि या बरोबरच चिंच, कवठ आणि मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची डेरेदार झाडे पाहायला मिळतात . विस्तीर्ण आमराई आणि जुने वृक्ष यांच्या सावलीत झाडांना बांधलेल्या झोपाळ्याची मजा घेता येते.
या भागात कृषी पर्यटन विकास केंद्रांची स्थापनाही झाली आहे त्या अनुशंघाने औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात . मोराच्या चिंचोलीला जायचे असेल तर कुठे राहाल?
या पर्यटन केंद्रात एक रात्रीच्या राहण्याकरिता सोय उपलब्ध आहे . शाकाहारी जेवणाची सोय होते . तसेच राहण्या साठी नद्यांची नावे असलेली टुमदार कॉटेज राहायला दिली जातात .
मोर पाहण्यासाठी खास मयुर कट्टा त्यांच्या शेताच्या आवारात बांधलेला आहे . मयुर पॉइट वरून आपण नाचरा मोर आणि लांडोरी पाहू शकतो . परंतु शेतात फिरून मोर पाहण्याचा आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याचा अनुभव विरळाच असतो
मोर पाहणे हा पक्षी निरीक्षणाचाच एक भाग आहे . या परिसरात साधारण अडीच हजार मोर आहेत त्यामुळे या भागात तुम्हाला सतत मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो . काही वेळा त्या आवाजा वरून ते फारच जवळ आहेत असा भास होतो . शेतात फिरून या मोरांच्या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतो . नाचरा मोर , पिस स्वच्छ करणारा मोर , सकाळी झाडाच्या शेंड्या वर बसलेले अनेक मोर पाहायला मिळतात . मोराबरोबरच लांडोरीही फार मोठ्या संख्येत पाहायला मिळतात . शेतात तीन चार लांडोरी फिरताना दिसल्या तर समजावे कि मोर आसपासच आहे . मोर आणि लांडोर या दोघानाही उडताना पाहणे हे खरच दुर्मिळ दृश्य आहे . परतू मोराच्या चिंचोलीत असे अनुभव सहज मिळतात मोरांव्यातिरिक्त विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात . बया पक्षी घरटी बांधताना आपण सहज पाहू शकतो
म्हाळसाकांताच पुरातन मंदिरं आणि खेडेगावातील साध जीवन मनाला जीवनातील खऱ्या आनंदाची जाणीव करून देत आणि रोज आपल्या पैशांभोवती सजवलेल्या ध्येय वादाच्या मागे धावणारे आपण काही क्षण थांबून पुन्हा मनाला प्रश्न विचारतो कि खरच सुख म्हणजे नक्की काय असत ?लांबवर पसरलेली शेत , त्यात कष्ट करणारे शेतकरी पहिले कि मन कृतज्ञतेने भरून येत . त्यांच्या कष्टातून पिकणाऱ्या धान्यातून,भाजी पाल्यातूनच
आपले रोजचे पदार्थ तयार होत असतात . अशा शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि त्यांच्या जीवनशैलीला मनापासून सलाम !
मोराच्या चिंचोली पासून वीस किलोमीटर वर आणखी एक महत्वपूर्ण आणि निसर्गाचा अनोखा आविष्कार दाखवणार ठिकाण पाहायला मिळत निघोज कुंड /मळगंगा कुंड /रांजण खळगे अस त्यांना म्हटल जात . अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेले खळगे (पॉट होल्स ) इथे आपल्याला पाहायला मिळतात . फक्त त्यांच्याशी खेळ करण धोकादायक ठरू शकत . गावकरी अस सांगतात कि वरून छोटे दिसणारे हे खळगे फार खोल असून त्यांना आतून भुयारे तयार झाली आहेत . एखादी व्यक्ती खळग्यात पडली तर पुन्हा बाहेर येऊ
शकत नाही .
अष्टविनायकातील रांजण गावचा महागणपतीही इथून जवळच्या अंतरावर आहे . त्याचेही दर्शन आपण नक्की घेऊ शकतो . शिवाय शिक्रापूर पासून जवळच संभाजी महाराजांची समाधी हि पाहता येते . दोन दिवसाच्या या सफरीत शहरातील गोंधळ, कोलाहल ,प्रदूषण , दगदग , स्ट्रेस या पासून आपण अनेक योजने दूर जातो असा म्हणायला हरकत नाही
या लेखाच्या पहिल्या भागात आपण इथेच थांबू . दुसर्या भागात आणखी काही नवीन फोटो आणि विडीओ पाहण्यासाठी या ब्लोग ला जरूर भेट द्या पुढचा भाग पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल
अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर किती मौज येईल !आज शहरी जीवनात जगताना मुलांना आंब्याच्या वनाची आणि नाचणाऱ्या मोराची पुसटशी कल्पना करता येणहि फारच दुर्मिळ आहे . ज्या बच्चे कंपनीला कोकणातले आजोळ असेल किंवा गावी राहणारे आजी आजोबा असतील त्यांनी मोर नाही तरी आंब्याचे बन नक्की पहिले असेल पण गाव नसेल किंवा गावी आजोळ नसेल तरी या सर्वाचा निर्भेळ आनंद मुंबई आणि पुण्यातील लोकांना घेणे आता सहज शक्य झाले आहे .
मुंबई आणि पुण्या पासून जवळच "मोराची चिंचोली " या गावी फेरफटका मारलात तर हे सहज शक्य आहे . जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचा सुखद अनुभव घेत घेत , वाहणारे निर्झर आणि हिरवळ याचा आस्वाद घेत घेत आपण मोराच्या चिंचोलीला येउन कधी पोचतो हे काळतही नाही . वाटेत दिसणारे मेंढपाळ आणि भली मोठी मेंढ्यांची झुंड वारंवार तुम्ही मुंबई सोडून छानश्या खेडेगावा कडे निघाले आहात याची साक्ष देतात .
Morachi Chincholi |
Morachi Chincholi |
Morachi Chincholi |
. बाजरीची शेती दिसते . आणि या बरोबरच चिंच, कवठ आणि मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची डेरेदार झाडे पाहायला मिळतात . विस्तीर्ण आमराई आणि जुने वृक्ष यांच्या सावलीत झाडांना बांधलेल्या झोपाळ्याची मजा घेता येते.
या भागात कृषी पर्यटन विकास केंद्रांची स्थापनाही झाली आहे त्या अनुशंघाने औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात . मोराच्या चिंचोलीला जायचे असेल तर कुठे राहाल?
या पर्यटन केंद्रात एक रात्रीच्या राहण्याकरिता सोय उपलब्ध आहे . शाकाहारी जेवणाची सोय होते . तसेच राहण्या साठी नद्यांची नावे असलेली टुमदार कॉटेज राहायला दिली जातात .
मोर पाहण्यासाठी खास मयुर कट्टा त्यांच्या शेताच्या आवारात बांधलेला आहे . मयुर पॉइट वरून आपण नाचरा मोर आणि लांडोरी पाहू शकतो . परंतु शेतात फिरून मोर पाहण्याचा आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याचा अनुभव विरळाच असतो
Peacock at the top of tree in Morachi Chincholi मोराची चिंचोली |
मोर पाहणे हा पक्षी निरीक्षणाचाच एक भाग आहे . या परिसरात साधारण अडीच हजार मोर आहेत त्यामुळे या भागात तुम्हाला सतत मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो . काही वेळा त्या आवाजा वरून ते फारच जवळ आहेत असा भास होतो . शेतात फिरून या मोरांच्या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतो . नाचरा मोर , पिस स्वच्छ करणारा मोर , सकाळी झाडाच्या शेंड्या वर बसलेले अनेक मोर पाहायला मिळतात . मोराबरोबरच लांडोरीही फार मोठ्या संख्येत पाहायला मिळतात . शेतात तीन चार लांडोरी फिरताना दिसल्या तर समजावे कि मोर आसपासच आहे . मोर आणि लांडोर या दोघानाही उडताना पाहणे हे खरच दुर्मिळ दृश्य आहे . परतू मोराच्या चिंचोलीत असे अनुभव सहज मिळतात मोरांव्यातिरिक्त विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात . बया पक्षी घरटी बांधताना आपण सहज पाहू शकतो
मोराची चिंचोली बया पक्षी |
म्हाळसाकांताच पुरातन मंदिरं आणि खेडेगावातील साध जीवन मनाला जीवनातील खऱ्या आनंदाची जाणीव करून देत आणि रोज आपल्या पैशांभोवती सजवलेल्या ध्येय वादाच्या मागे धावणारे आपण काही क्षण थांबून पुन्हा मनाला प्रश्न विचारतो कि खरच सुख म्हणजे नक्की काय असत ?लांबवर पसरलेली शेत , त्यात कष्ट करणारे शेतकरी पहिले कि मन कृतज्ञतेने भरून येत . त्यांच्या कष्टातून पिकणाऱ्या धान्यातून,भाजी पाल्यातूनच
आपले रोजचे पदार्थ तयार होत असतात . अशा शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि त्यांच्या जीवनशैलीला मनापासून सलाम !
मोराच्या चिंचोली पासून वीस किलोमीटर वर आणखी एक महत्वपूर्ण आणि निसर्गाचा अनोखा आविष्कार दाखवणार ठिकाण पाहायला मिळत निघोज कुंड /मळगंगा कुंड /रांजण खळगे अस त्यांना म्हटल जात . अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेले खळगे (पॉट होल्स ) इथे आपल्याला पाहायला मिळतात . फक्त त्यांच्याशी खेळ करण धोकादायक ठरू शकत . गावकरी अस सांगतात कि वरून छोटे दिसणारे हे खळगे फार खोल असून त्यांना आतून भुयारे तयार झाली आहेत . एखादी व्यक्ती खळग्यात पडली तर पुन्हा बाहेर येऊ
शकत नाही .
रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड |
रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड |
अष्टविनायकातील रांजण गावचा महागणपतीही इथून जवळच्या अंतरावर आहे . त्याचेही दर्शन आपण नक्की घेऊ शकतो . शिवाय शिक्रापूर पासून जवळच संभाजी महाराजांची समाधी हि पाहता येते . दोन दिवसाच्या या सफरीत शहरातील गोंधळ, कोलाहल ,प्रदूषण , दगदग , स्ट्रेस या पासून आपण अनेक योजने दूर जातो असा म्हणायला हरकत नाही
या लेखाच्या पहिल्या भागात आपण इथेच थांबू . दुसर्या भागात आणखी काही नवीन फोटो आणि विडीओ पाहण्यासाठी या ब्लोग ला जरूर भेट द्या पुढचा भाग पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल
Hi Kshama, hey khoopach chaan ahe. Mala jaychay. Mor ani landor distat ka atta? Konitari bolla ki te tourists na baghun yet nahi.
ReplyDeleteमुख्य म्हणजे तिकडे एक रात्र तरी राहिला तर मोर सहज दिसतात . दोन तीन तासात दिसत नाहीत
Deleteपाहते शेतात फिरून पाहता येतात . लांडोरी आणि मोर एकत्र पाहायला मिळतात . शनिवार /रविवार न जाता इतर दिवशी गेल्यास जास्त संख्येने दिसतात कारण जास्त पर्यटक आले तर ते दडून बसतात