अजूनही आपल्या आसपास किती जण फोन बिल / वीज बिल / विम्याचे हप्ते / महानगर पालिकेचे कर / बँक रिकरिंग किंवा पी पी फ चे पैसे रांग लावून भरतात ? तर उत्तर असेल ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक . परवाच पोस्टात काही कामा करिता गेले असता तिकडे वीज बिल भरणार्यांची भली मोठी रांग पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं . आत्ताच्या युगात असे सगळे व्यवहार पार पाडण्यासाठी विविध पद्धतींचा सहज वापर करता येत असूनही आपण रांग लावण्यात
आपल्या वेळचा अपव्यय का करावा ? सहजच विचार मनात आला कि महिन्या भरात लोकं अशा किती ठिकाणी रांगेत उभे राहत असतील आणि असे उभे राहण्याचे तास मोजले तर किती होत असतील . मुख्य म्हणजे आयुष्याचे बरेचसे तास अश्या लोकांना रांगेत उभ राहवून वाया दवडावे लागतात . काही वेळा तर अतिमहत्वाची कामे बाजूला सारून अंतिम देय तिथी नजीक आल्याने अशा रांगांना तोंड द्यावे लागते . अनेक वेळा तर तासंतास उभ राहून आपली वेळ येताच खिडकी बंद होण्याची वेळ येते व त्या दिवशीचा सगळा वेळ वाया जातो .
जे कुणी माझे हे विचार वाचत असाल त्यांना नक्कीच इंटरनेट वापरण्याची सवय असेल . आता तुम्हीच विचार
करा कि तुम्ही तुमचे जे व्यवहार अशा रांगा टाळून करता येतील ते सगळे व्यवहार आधुनिक पद्धतीने पूर्ण करता का ? करत असाल तर उत्तमच पण करत नसाल तर लगेच विचार करा कि तुम्ही
आज पर्यंत रांगेत किती वेळ वाया घालवलात ? आणि पुढेही किती वाया घालवणार आहात ?
मी तर म्हणेन कि जर तुम्ही या सगळ्या व्यवहारांशी परिचित असाल तर आपल्या आस पास वावरणाऱ्या लोकांना याचे महत्व पटवून द्या/जमणार असेल तर त्यांना मदतही करा . ज्या योगे त्यांचाही वेळ वाया जाणार नाही आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जीवनात इतर गोष्टी करण्याकरिता लागणारा वेळ आणि उर्जा ते वाचवू शकतील , त्यांचे स्वास्थ्य हि उत्तम राहील . एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !

No comments:
Post a Comment