होळी आणि धुळवड
दोन्हीही आपण
मोठ्या उत्साहात
साजरी केली
असेल . कधी
नव्हे ते
या वर्षी
होळी आधी पावसाने
हजेरी लावली
आणि वातावरणात
पुन्हा एकदा
गारवा निर्माण
झाला .
अचानक बदललेल्या वातावरणाने
एक नवीन
उत्साह निर्माण
केला . त्यावेळी
खर्या अर्थाने
जाणवलं कि आपण
कितीही
आधुनिक झालो आणि निसर्गा पासून
दूर गेलो
तरी त्याच
आणि आपल
नात अतूट आहे
आणि आपण
त्याच्यावर कितीही अन्याय केला तरी
तो आपल्यावर
प्रेम करणं
सोडत
नाही .
अशा पूरक वातावरणात
सण साजरा
करण्याच आणखी
एक महत्व
असतं ते
म्हणजे या
सणाच्या
अनुशंघाने जी पक्वान्न
आपण घरी
तयार करतो
ती खाताना
आणि सहकुटुंब
भोजन करताना
एक
वेगळा सुखद अनुभव
मिळतो . तुम्हीही
पुरण पोळी
,कटाची आमटी
ताव मारून
खाल्ली असेल
, मी
हि खाल्ली कारण
"घरच्या अन्नाची चवच न्यारी आणि
त्यामुळे कुटुंबही
खुश , लई
भारी "!
विनोदाचा भाग सोडला
तर एक
गोष्ट नक्की
सांगावीशी वाटते कि आजकाल कुटुंबात
पक्वान्न बाहेरून
मागवण्याचा कल वाढलेला
दिसतो . कामाच्या
व्यस्तते मुळे किंवा
बदललेल्या जीवनशैली मुळे पदार्थ
घरी करण्याची इच्छा
कमी झालेली
दिसते . माझी
सर्व महिला
आणि महिलांना
स्वैपाकघरात मदत
करणाऱ्या पुरुषांनाही कळकळीची
विनंती आहे
कि निदान
जमेल तेव्हा
जमेल त्या
सणाला नेहमी
जमणार
नसेल तर कधीतरी
पक्वान्न घरी
करायचा प्रयत्न
करा . आपल्या
मुलांनाही अशा वेळी मदती साठी
सामील करून घ्या
. एकत्र येउन
जेवण करा
आणि घरच्या
अन्नाचा आस्वाद
घ्या . तुमच्या
नक्की लक्षात
येईल कि अस
केलेला स्वैपाक
आणि त्या
नंतर केलेल
सहकुटुंब भोजन
हे अनेक
वेळा आयत्या
आणलेल्या
पदार्थान पेक्षा एक
वेगळी आपुलकी
देणारा अनुभव
असेल. त्याने
कुटुंबातील प्रेम तर वृद्धिगत होईलच
पण
एकमेकांसाठी एकत्र येउन
काम करण्याची
वृत्ती कुटुंबात
वाढेल .
तुम्हा सगळ्यांसाठी खास
पुरणपोळीचा विडीओ इथे शेअर करत
आहे . पुष्कळ
वेळा
आयती बाजारातून आणलेली
पुरणपोळी हि
मैदा आणि
साखर घालून
केलेली असते
कारण ती
करायला
सोपी आणि स्वस्त
पडते . पण
तुम्हाला जमेल
तेव्हा घरची
पुरण पोळी
हि गव्ह्च्या
पिठात (कणिक)
आणि गुळ वापरून
करण्याचा प्रयत्न
करा . हि
पोळी आरोग्यासाठी
उत्तम ठरते
आणि मैद्या
पासून व
साखरे पासून होणारे दुष्परिणाम
हि टाळते. मग काय आता करून बघणार ना अशी पुरण पोळी !
mat!!! khup chhan !!!
ReplyDeleteDhanyawad!
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete