Vegetable recipes |
आज माझ्या
जुन्या संग्रहित वस्तू चाळत बसले होते. त्या खजिन्यात मला एक
छान आठवण सापडली . माझी
विविध रेसिपीज लिहून ठेवलेली डायरी ! त्यातील
मला आवडलेल्या काही भाज्यांचे प्रकार आणि त्या करता
लागणाऱ्या ग्रेवि , सविस्तर
देत आहे. पहा तुम्हालाही आवडतात का? मी लहर आली कि अश्या भाज्या नक्की
करून पाहते, तुम्ही हि कुणाला मेजवानी करिता
बोलवायच्या विचारात असाल तर
नक्की करून पहा . ग्रेवि वेगळ्या पानावर देत आहे.
म्हणजे तुम्हाला संदर्भ घेणे
सोपे जाईल . भाज्या नक्की करून पहा आणि अभिप्राय नोंदवा!!!
ग्रेव्ही नंबर १ :
६ चमचे भिजवलेले काजू
खरबूज / तर्बुजाच्या बिया
४ चमचे खोवलेले खोबरे
६ चमचे खसखस
पाव इंच आले
ग्रेव्ही नंबर २ :
६ चमचे काजू
६ चमचे चिरलेला
कांदा
४ चमचे खसखस
४ चमचे खोवलेला
नारळ
४ लसुन पाकळ्या
१/२ इंच आले
ग्रेव्ही नंबर ३ :
६ चमचे
चिरलेला टोमेटो
३ चमचे काजू
२ चमचे
खसखस
४ चमचे खोवलेला
नारळ
८ लसुन
पाकळ्या
१ इंच
आले
ग्रेव्ही नंबर ४ :
ग्रेव्ही नंबर १ आणि १/२ वाटी कोथिंबीर , ४ हिरव्या मिरच्या
इनस्टंट गरम मसाला साहित्य :
१ चमचा शहाजिरे
१ चमचा तमालपत्र
१/२ चमचा लवंग
१/२ चमचा दालचिनी
१/२ चमचा मिरे
१/२ चमचा जिरे
५ बडी वेलची
१/४ जायफळ
१ चमचा धने
No comments:
Post a Comment