Saturday, March 19, 2016

आजची आरोग्य टीप - 2 (दंतधावन)

रोज सकाळी मलप्रवृत्ती साफ झाल्यावर ( शौचानंद मिळाल्यावर ) प्रथम दात घासावेत. (बाहेरून आणि आतूनसुध्दा अगदी अक्कलदाढे पर्यंत.)
दात घासण्यासाठी दंतमंजन किंवा कडुनिंब वा अन्य दातवण वापरावे.
दात घासण्यासाठी उजव्या हाताच्या अनामिकेचा वापर करू नये (रूढी परंपरा )
बाकी चारही बोटांचा युक्तीने वापर करावा.
दात घासून झाल्यावर आतून आणि बाहेरून हिरड्यांना हळुवार मसाज करावा.
कोणत्याही कंपनीची, कितीही स्वस्त आणि संपूर्ण स्वदेशी असली तरीही " टूथपेस्ट " वापरू नये. त्यातील सोडीयम लाॅरेल सल्फेट या घटकामुळे तोंडात फेस येतो. सावधान !!!!
आपण कोणते दंतमंजन वापरावे ?

ज्यामधे कोणतेही रसायन (केमिकल) नाही,
पुर्णतः नैसर्गिक !
म्हणजेच ज्या दंतमंजनाला कधीही फेस येत नाही ,
जे चवीला गोड किंवा मिरमिरीत नाही, असे दंतमंजन वापरावे.
दंतमंजन किंचीत तुरट किंचित तिखट आणि किंचीत कडवट असावे. पण कधीही आत्यंतिक गोड, आंबट, आणि खारट नसावे.
नियमितपणे अश्या चवींचे दंतमंजन वापरू नये. याने दातांची झीज होते.
आज बाजारात मिळणार्‍या जवळपास सर्व टूथपेस्ट चवीला गोड आहेत.
या ऐवजी वड, खैर, आघाडा, अर्जुन एरंड, कडूनिंब आदि किंचीत तुरट, कडू, तिखट चवींच्या रसदार काड्यांचा "ब्रश" तयार करून त्याने दात घासावेत. त्याच्या रसाने हिरड्या चोळाव्यात.
दंतधावन करण्यासाठी ईशान्य आणि पूर्व दिशेला तोंड करून, मौन पाळून बसावे. (फिरत फिरत गप्पागोष्टी करीत दंतधावन करू नये. तोंडातील जंतु वा लाळ बाहेर पडून इतरांना त्याचा त्रास होतो. )
आचार्यांनी विशिष्ट दिशेचा उल्लेख केला आहे, याचा अर्थ अन्य दिशांना तोंड करून बसल्याचे दुष्परिणाम त्यांनी अनुभवले होते.
शहरात हे शक्य आहे का ?
असा प्रश्न कृपया विचारू नये.
जे जे उत्तम असेल ते ते स्विकारावे.
आखिर जिंदगी अपनी है।
जी लो अपने तरीकेसे ।।
टूथब्रश म्हणजे तोंडातील खराटाच !
सक्काळी सक्काळी यापेक्षा चांगले काही मिळतच नाही का ?
विषारी टूथपेस्ट तर नकोच, त्यापेक्षा खतरनाक असतो तो प्लॅस्टिकचा टूथब्रश !
आजचे विज्ञानच सांगते आहे, कि प्लॅस्टिक हे आरोग्याला अपाय करणारे आहे ! प्लॅस्टिकचा अतिवापर कॅन्सरजनक आहे वगैरे
मग सकाळी दातांच्या स्वच्छतेसाठी प्लॅस्टिकचा "एक्स्पायर डेट " झालेला ब्रश ? कॅनेडियन डेंटल असोसिएशन म्हणते एक ब्रश फक्त सात दिवस वापरावा. आणि भारतात एक ब्रश सात सात वर्षे वापरणारी मंडळी आहेत. ( अज्ञान, घोर अज्ञान !)
वा रे आधुनिकता !
बरं हे ब्रश कसे बनवतात हे बघितलंय का कधी ?
गटार ऊकीरडे यातून गोळा करून नेलेले प्लॅस्टिक पुनः रिसायकल करतात आणि ब्रश बनवितात.
मला आश्चर्य वाटते एरव्ही नको त्या ठिकाणी स्टरलायझेशन ऑटोक्लेव वगैरे आणि थेट तोंडात जाणारा ब्रश मात्र नुसता नळाखाली धरला की शुध्द होईल का ?
वापरून झाल्यावर ओलेकच्च असलेले सर्वांचे ब्रश एकाच ब्रशदाणीत तेवीस तास पन्नास मिनीटे एकमेकांशी सलगी करून पहुडलेले असतात. एकमेकांशी असलेल्या या अतिसंपर्कामुळे एक दुसर्‍याचे "सोकाॅल्ड इन्फेक्शन" एकमेकांकडे जाणार नाही ?
आजच्या नवीन नवीन व्हायरल रोगांच्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला नको ?
कितीही साॅफ्ट म्हटला तरी हाताच्या मागील बाजुला एकाच ठिकाणी रोज 10 मिनीट घासून बघा.....
रक्त येईल.
मग नाजूक हिरड्यांची अवस्था काय होईल ?
म्हणून आपण हिरड्यांना ब्रशचा संपर्कच टाळतो आणि हिरड्या नाजूक बनतात. मग पिकलेलं केळं खाल्लं तरी त्यावर रक्त दिसेल !
ज्याच्या हिरड्या नाजूक त्याचे चांगले दातही खाली यायला कितीसा वेळ लागणार ?
याला पर्याय काय ?
दंतमंजन हातावर घेऊन पुर्व दिशेला तोंड करून ऊकिडवे बसून दोन्ही ढोपरांच्यामधे हाताचे कोपर ठेवून, हात धुवून, उजव्या हाताच्या मस्त चारही बोटानी दात घासावेत. ( एक सुधारणा तर्जनी 👆�सोडून)
हो एक गोष्ट आणखीन !
नखे वाढलेली नकोत, त्यांचे विषारी रंगकाम देखील गडबड करणारे आहे. ( नेलपेंट म्हणायचंय मला )
बोटांचा आवश्यक तेवढा दाब दात आणि हिरड्यांवर पडतो.
या कृतीमधे "इन्फेक्शन " चे चान्सेस कमीत कमी.
आपलेच दात आपलेच बोट !
आपलं इन्फेक्शन आपल्यापाशी !!
टूथपेस्ट ची टेक्नोलॉजी आली पश्चिमेकडून ! म्हणजे पाश्चात्यांची !
दंतमंजन भारतीय म्हणजे पूर्वेचे !
"पश्चिमेकडून" येत असलेले ते सर्व ऊत्तम अशी "पूर्वेकडील" लोकांची धारणा असल्याने "ऊत्तर" दिशेकडचे सर्वात उत्तम असते, ही संकल्पनाच मनातून गेली आहे.
औषधे घेत असताना ऊत्तर दिशेला तोंड करून घ्यावे किंवा वनस्पती काढत असताना ऊत्तर दिशेच्या वनस्पती घ्याव्यात असे सांगितले जाते. पूर्व उत्तर ईशान्य या दिशा शुभ मानल्या आहेत.
पण आमचा " पश्चिमेवरील" विश्वास एवढा दृढ होत चालला आहे की योग्यायोग्य विवेक देखील नाहीसा होत चालला आहे.
आज तीन प्रकारच्या वस्तु उपलब्ध आहेत.
विदेशी स्वदेशी आणि देशी !
विदेशी म्हणजे ज्याचे तंत्र पश्चिमी देशांचे ! ज्याच्या खरेदीतील मोठा हिस्सा विदेशातच जातो. या वस्तू आरोग्याला हानिकारक असतात. जसे टूथपेस्ट, ब्रश. उदा. कोलगेट, पेप्सोडेंट, जाॅन्सन, हिंदुस्थान लीवर, बाटा इ.इ.
देशी म्हणजे ज्याचा मालक भारतीय, पण तंत्र पाश्चिमात्य ! आर्थिक फायदा भारतालाच होईल. पण या वस्तु आरोग्याला हितकारक असतीलच असे नाही. जश्या टूथपेस्ट ब्रश. उदा. पतंजली, बबूल विको. इ.इ.
आणि स्वदेशी म्हणजे ज्याचे तंत्र (technology) घरातील, भारतातील आयुर्वेदातील !
ज्याचा मालक भारतीय.
खरेदीनंतर पैसा भारतातच राहील. या वस्तुंची निर्मिती आणि वापर देशाच्या आणि देहाच्या आरोग्याकरीता सर्वोत्तम असेल. उदा. स्वतःच्या घरात बनवलेले कोणतेही दंतमंजन. किंवा पतंजली दंतमंजन, सनातनचे दंतमंजन, विको माकडछाप, इ.इ.दंतमंजन. ( पेस्ट नव्हे)
आयुर्वेदातील तंत्रज्ञान वापरून केलेल्या वस्तु देशाचे आणि देहाचे आरोग्य निश्चितपणे ऊत्तम राखतात.
जय आयुर्वेद !
जय भारत !!
जय देशी !!!

दंतधावन कसे करावे ?
वड, औदुंबर, करंज, आघाडा, खैर कडूनिंब, आंबा, बकुळ इ.पैकी एका वनस्पतींची करंगळी एवढ्या जाडीची आणि एक वीत लांबीची रसदार काडी काढावी. धुतल्यावर दातांनीच तिचे एक टोक चावून त्याचा ब्रश करावा. या ब्रशानेच दातांवर योग्य दाब देऊन दात घासावेत.
दात घासून झाल्यावर आतून आणि बाहेरून हिरड्यांना हळुवारपणे मसाज करावा.
तर्जनीचा वापर न करता बाकीच्या बोटांनी दातही स्वच्छ करावेत.
‪#‎तर्जनी‬ ही वायु तत्वनिदर्शक आहे.
‪#‎ती‬ पितरांसाठी राखीव आहे.
‪#‎या‬ बोटाने जास्त दाब पडू शकतो इ. शक्यता लक्षात घेऊन ती निषिध्द सांगितली आहे.
काडीचा ब्रश केलेला भाग तोडून ईशान्य दिशेला टाकावा. पाण्याने नीट धुवून काडी योग्य जागी गुंडाळून ठेवावा. कांडी सुकल्यास पाण्यात ठेवावी.
( युज अॅड थ्रो पद्धत आपल्याकडूनच पाश्चात्यांनी घेतली असावी. )
दात घासताना मौन पाळलेच पाहिजे.
हाताचे कोपर गुडघ्यांच्या आत घेऊन दात घासले तर हिरड्या व दातांवर पडणारा दाब योग्य असतो असे लक्षात येते.
प्रतिपदा षष्ठी अष्टमी नवमी अमावास्या पौर्णिमा जन्मदिवस या विशिष्ट दिवशी दातवण वापरू नये. त्याऐवजी दंतमंजन म्हणजे या वनस्पतींची केलेली पावडर वापरावी.
कधी वापरावे म्हणजे विधी, आणि कधी वापरू नये याचा निषेध, असा विधीनिषेध जिथे सांगितला जातो, ते शास्त्र !
आजच्या काळात शहरात रेल्वे स्टेशनवर दातवण / काड्या विकत मिळतात. यांच्याकडून घासाघीस न करता जरूर खरेदी करावी. अन्यथा दंतमंजन वापरावे.
दातात जे अन्नकण अडकतात ते काढण्यासाठी काडीचा ब्रश किंवा पाण्याने खळखळून चुळा भराव्यात.
भारतात सर्व पाण्याच्या स्रोतामधे नैसर्गिक फ्लोराइड असते. टूथपेस्ट मधून फ्लोराइड जास्त जाते. आणि फ्लुरोसीस नावाचा रोग होतो.
घरगुती दंतमंजन - त्रिफळा चूर्ण त्यात तुरटी मिरी कापूर आणि अगदी थोडे सैंधव मिसळले की, झाले तयार दंतमंजन
लागा कामाला !
वैद्य सुविनय दामले.

No comments:

Post a Comment