मोराची चिंचोली : पहिला भाग
मोराच्या चिंचोलीला कस पोचाल ?
पुणे ते चिंचोली मोराची
आगावू बुकिंग करण्या करिता तुम्ही ९८२३३४७२३३ / ९६२३२५२४४४ /९६६५८३७७७७ वर संपर्क करू शकता . पर्यटन केंद्रात मोर पाहण्यासाठी मयुर कट्टा बांधलेला आहे . सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी इथे मोर सहज पाहायला मिळतात . बैलगाडी आणि ट्रक्टर सफारीचा आनंदही घेत येतो . पर्यटन केंद्रात
किल्ल्यांची आणि अंतराळाविषयी महिती देणारा एक छोटे खानी विभाग पाहायला मिळतो . ग्रामीण जन जीवन दर्शवणारे देखावे तसेच शेतीची अवजारे पाहायला मिळतात
काळीशार जमीन , शुद्ध हवा , मोजकीच लोक वस्ती , प्रदूषण विरहित प्रदेश असलेल्या या भागत राहणारी माणसंहीमनाने निर्मळ आहेत . मल्हारी मार्तंडा वर निस्सीम भक्ती असणारी हि लोक सकाळी देवातार्चनाला जाताना दिसतात . मोर पाहण्याचा खरा आनंद इथे घ्यायचा असेल तर किमान एक रात्र तरी राहावे लागते . मोर सकाळी ६.० ते ८.०० वाजे पर्यत तर संध्याकाळी ४.३० ते ७.०० वाजे पर्यंत पाहता येतात . शेतात फिरून मोर पाहणे फारच विलोभनीय अनुभव ठरतो . सकाळी मोर झाडाच्या उंच शेंड्यावर बसून सभोवताल चे निरीक्षण करताना दिसतात . भल्या पाहटे पासून त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानेच आपल्याला जाग येते.
गावात फिरताना बर्याच जुन्या विहिरी पाहायला मिळतात. पाण्या अभावी अशा कोरड्या विहिरीन मध्ये बया पक्षी आपले घरटे बांधताना दिसतो . त्याला पाहणे खरच मन मोहून टाकणारा अनुभव असतो .
रांजण खळगे पाहून झाले कि रांजण गावाच्या महागणपतीच दर्शन आवर्जून घ्या
अतिशय दुर्गम भाग आणि पाण्याचा अभाव असूनही गावकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करावे तितके कमी आहे .
कृत्रिम तलाव तयार करून शेती करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे .
मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे परंतु त्याचे सहजतेने दिसणे आज काल दुर्मिळ झाले आहे . परंतु या गावात अडीच हजार मोरांची वस्ती आहे आणि इथले शेतकरी पुढाकार घेऊन त्यांचे रक्षण करत आहेत हि खरच अभिमानाची गोष्ट आहे .
चला तर मग कधी निघताय मोराच्या चिंचोलीला ? शुभ यात्रा !!!
वरील दोन्ही भागांबद्दल अभिप्राय नक्की कळवा ……….
मोराच्या चिंचोलीला कस पोचाल ?
पुणे ते चिंचोली मोराची
मुंबई ते मोराची चिंचोली
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची उत्तम व्यवस्था होते . रुपये १५०० ( एका व्यक्ती करिता ) आकारले जातात . त्यात रहायची सोय तसेच आपण पोहचू त्यादिवशीचा नाश्ता , जेवण आणि संध्याकाळी उपहार तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्ट्या पर्यंतची सोय होते . दुसऱ्या दिवशी जेवण व्यवस्था हवी असेल तर अतिरिक्त पैसे आकारले जातात .
आगावू बुकिंग करण्या करिता तुम्ही ९८२३३४७२३३ / ९६२३२५२४४४ /९६६५८३७७७७ वर संपर्क करू शकता . पर्यटन केंद्रात मोर पाहण्यासाठी मयुर कट्टा बांधलेला आहे . सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी इथे मोर सहज पाहायला मिळतात . बैलगाडी आणि ट्रक्टर सफारीचा आनंदही घेत येतो . पर्यटन केंद्रात
किल्ल्यांची आणि अंतराळाविषयी महिती देणारा एक छोटे खानी विभाग पाहायला मिळतो . ग्रामीण जन जीवन दर्शवणारे देखावे तसेच शेतीची अवजारे पाहायला मिळतात
काळीशार जमीन , शुद्ध हवा , मोजकीच लोक वस्ती , प्रदूषण विरहित प्रदेश असलेल्या या भागत राहणारी माणसंहीमनाने निर्मळ आहेत . मल्हारी मार्तंडा वर निस्सीम भक्ती असणारी हि लोक सकाळी देवातार्चनाला जाताना दिसतात . मोर पाहण्याचा खरा आनंद इथे घ्यायचा असेल तर किमान एक रात्र तरी राहावे लागते . मोर सकाळी ६.० ते ८.०० वाजे पर्यत तर संध्याकाळी ४.३० ते ७.०० वाजे पर्यंत पाहता येतात . शेतात फिरून मोर पाहणे फारच विलोभनीय अनुभव ठरतो . सकाळी मोर झाडाच्या उंच शेंड्यावर बसून सभोवताल चे निरीक्षण करताना दिसतात . भल्या पाहटे पासून त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानेच आपल्याला जाग येते.
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील नव्याने तयार होणारे नक्षत्र वनहि पाहण्या सारखे आहे .
मला आवडलेल्या मोरांच्या काही हालचाली या विडीओ मध्ये चित्रित केल्या आहेत
मोरांसह इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण भरून जाते . किकीर्डे , खंड्या, बया पक्षी , खार , भारद्वाज, कबुतरं सहज दिसतात . भाजी पाल्याची शेतीही केली जाते . शेपू, मेथी , कोथिंबीरी सारख्या ताज्या भाज्या सहज मिळतात. दाट आमराई आणि डाळींबा च्या बागा जागोजागी पाहायला मिळतात .
तुम्ही झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंदही या परिसरात घेऊ शकता .असा झोपाळा तुम्हाला म्हाळसाकांत कृषी पर्यटन केंद्रात पाहायला मिळतो झोपल्यावर झुलत गरम गरम कांदा भज्यांचा आस्वाद घेता येतो
शेतात ओरडणारे , रुबाबात चालणारे मोर पाहताना मन वेगळ्याच आनंदाच्या विश्वात निघून जात. झाडाच्या शेंड्यावर बसून एकमेकला आरोळी देणारे मोर जेव्हा शेताच्या दिशेने उडू लागतात तेव्हाचे दृश्य अतिशय मन मोहक असते. तुम्हा सर्वासाठी रेकॉर्ड केलेले काही खास मोराचे विडीओ इथे पोस्ट करत आहे .
गावात फिरताना बर्याच जुन्या विहिरी पाहायला मिळतात. पाण्या अभावी अशा कोरड्या विहिरीन मध्ये बया पक्षी आपले घरटे बांधताना दिसतो . त्याला पाहणे खरच मन मोहून टाकणारा अनुभव असतो .
रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन आणि निघोज कुंड /रांजण खळगे पाहण्यासाठी साधारण २० किलो मीटर
अंतर पार करावे लागते . गावकरी तिथ पर्यंत जाण्याकरिता उत्तम मार्गदर्शन करतात . स्वतःचे वाहन
असेल तर हा प्रवास फारच सुखकर होतो .या निघोज कुंडाचा विडीओ खास तुमच्या साठी
अनेक वर्षांपूर्वी तयार झालेले हे रांजण खळगे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि त्यांचे तयार होणे आजही एक गुपित आहे .
Ranjangaon Mahaganapati Mandir |
रांजणगाव महागणपती मंदिर |