Tuesday, October 6, 2015

डायबेटीस : डॉक्टरांनी दिलेला सल्ला

डायबेटीस : डॉक्टरांनी दिलेला सल्ला

नित्यनेमाने एक तास फिरणे किंवा योग आणि प्राणायाम किंवा  असा व्यायाम ज्याने शरीरातून घाम येईल

योग्य आहार , समतोल आहार आणि ठरलेल्या वेळेत आहार या तीन गोष्टींच काटेकोर पालन .

आहार आणि आहाराच्या साधारण वेळा ज्या जपल्याने फायदा झाला .

१) सकाळी उठल्यावर चहा आधी
कोरफड + आवळा ज्यूस / दुधी + आवळा ज्यूस /जांभूळ ज्यूस /कारलं + आवळा ज्यूस ( पतंजली )
२) ब्रेकफास्ट : उपमा / पोहे / इडली / ऑम्लेट /ओंट्स /दलिया  , प्रोटीन पावडर ( साखर नसेल अशी )
३) सकाळी ११ वाजता एक फळ ( सफरचंद / डाळिंब / पपई /पेर /पिच /कलिंगड /संत्र /मोसंब ) व सलाड (काकडी ,टोमाटो , कांदा, मुळा ) { बीट आणि गाजर वर्ज्य }
सलाड फळा बरोबर किंवा जेवणाच्या एक तास आधी खावे
४) दुपारी १ ते २ या वेळात पूर्ण जेवण (भाकरी / पोळी आणि दही , भाजी , भात , वरण किंवा आमटी )
५) दुपारी ३ वाजता एक फळ
६) संध्याकाळी ६ वाजता एक फळ किंवा मेरी बिस्किट्स ( पतंजली मेरी घ्यावी . ती गव्हाची आहेत मैद्याची नाहीत ) किंवा चणे
७) रात्री ८.३० ते ९. ३० या वेळात जेवण ( भात कमी खावा) (सलाड भरपूर खावे )
वर्ज्य काय ?
नारळ पाणी , नारळ, गोड पदार्थ , बेकरीतील पदार्थ , मैदा , तेलकट पदार्थ
वर्ज्य फळे : केळ , चिकू , फणस,आंबा ,द्राक्ष ,सीताफळ

( वर दिलेल्या गोष्टी व्यक्ती सापेक्ष बदलू शकतात . परंतु या आहाराचा विचार आपल्या तब्बेतीच्या योग्यते प्रमाणे नक्की करू शकता . बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या . )
मांसाहार करत असाल तर  विडीओ आवर्जून पहा 

Monday, October 5, 2015

बटाटा कसा खावा ?


डॉ. जितेंद्र घोसाळकर 
बटाटे >>>>
====
जगभरात सर्वत्र आढळणारी, जास्त वापरली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीची अशीही भाजी. सर्वांच्या आवडीचे कारण म्हणजे चविष्ट आणि पौष्टिकपणा. बटाटा खाल्ल्याने फॅटचे प्रमाण वाढते असे अनेक जणांचे मत आहे. पण असे नाहीये, यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस तत्व आढळून येते. बटाटा स्किन हेल्थसाठीसुद्धा उपयुक्त आहे.
बटाटे उकडून घेतल्यानंतर शिल्लक पाण्यामध्ये एक बटाटा बारीक करून, या मिश्रणाने केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतील. तसेच केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. डोक्यात खाज, केस पांढरे होणे, टक्कल या समस्याही दूर होतील.
वजन कमी करण्यात सहायक -
वजन कमी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला उकडलेले बटाटे थोडेसे मीठ टाकून काह्याला दिल्यास लाभ होईल. वजन बटाट्यामुळे वाढत नाही तर बटाटे तळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तेल-तुपामुळे वाढते. कच्चे बटाटे शिजवून तेल-तुपान न तळता खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. एका सामान्य आकाराच्या बटाट्यामध्ये 168 कॅलरी,5 ग्रॅम प्रोटीन आणि 3 ग्रॅम फायबर असते. काही जणांच्या मते जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन डायजेस्ट करण्यासाठी त्रास होतो. असे आजीबात नाही, तुम्ही जर डायटिंग करत असाल तर, बटाट्याचे सेवन करणे तुमच्यासाठी बेस्ट डाएट आहे. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.
उच्च रक्तदाब ( हाय ब्लड प्रेशर) नॉर्मल करण्यासाठी -
उच्च रक्तदाबाशी संबंधित रुग्णांनी उकडलेल्या बटाट्यांचे सेवन करणे लाभदायक ठरते. बटाटा पोटॅशियमचा चांगला स्रोत असून यात केळीपेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशियम आढळते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यातून(सालीसह) दररोजची 18 टक्के पोटॅशियमची गरज भागवली जाते. पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो.
अ‍ॅसिडिटी नियंत्रणात येते -
मध्यम आकराच्या बटाट्याचा रस तयार करून दररोज याचे सेवन केल्यास पाचन तंत्र ठीक होण्यास मदत होते. या रस सेवनाने अ‍ॅसिडिटी नियंत्रणात राहते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार बटाट्याचा रस घेतल्याने अल्सर ठीक होण्यास मदत होते. यात असणारे अँटीऑक्सीडंट्स आतडे आणि पचन प्रणालीतील आग कमी करतात.
झोप लागत नसेल तर -
ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या असेल त्यांनी उकडलेल्या बटाट्यांचे सेवन अवश्य करावे. बटाटा पोटातील आम्ल तत्वांचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. आम्लाच्या प्रभावामुळे झोप अनियंत्रित होते. झोपण्यापूर्वी एक उकडलेले बटाटे आणि एक ग्लास दुध घेतल्यास शांत झोप लागेल.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते -
सर्वांनाच माहिती आहे की, बटाट्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. कच्चा बटाटा बारीक करून एक चमचा रस दिवसातून कमीतकमी चार वेळेस घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे शरीराला विविध प्रकारच्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. बटाट्यामुळे थकवा, कमजोरी कमी होण्यास मदत होते.
त्वचा उजळते -
बटाट्याचा उपयोग त्वचा उजळ करण्यासाठीही केला जातो. ताजे बटाटे बारीक करून चेहर्‍यावरील पुरळ, फोड, काळ्या डागांवर लावल्यास लाभ होतो. ताज्या बटाट्याच्या रसाने चेहरा धुतल्यास विविध प्रकारचे डाग नष्ट होण्यास मदत होते. डोळे सुजले असल्यास त्यावर कच्चा बटाटा ठेवा, आराम मिळेल.
मुळव्याधीत आराम -
ताज्या बटाट्याचा रस मुळव्याधीच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. मुळव्याध झालेल्या व्यक्तीने दररोज एक ग्लास बटाट्याच्या रसाचे सेवन करावे तसेच हा रस प्रभावित अंगावर लावावा.
रक्ताल्पता (अ‍ॅनीमिया) -
बटाट्यामध्ये आयर्न (लोह) तत्व भरपूर प्रमाणात असते. हे तत्व लाल रक्तपेशी निर्माण करण्यास अत्यावशक असते. यामुळे अ‍ॅनीमिया रोगापासून दूर राहण्यासाठी बटाटा रामबाण उपाय आहे. पाताळकोट येथील हर्बल जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार बटाट्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
ताजे बटाटे बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट एखाद्या जखमेवर किंवा जळलेल्या भागावर लावल्यास त्वरित आराम मिळेल. ताज्या बटाट्याची साल भाजलेल्या अंगावर ठेवल्यास आराम मिळेल. जळलेल्या जखमेवर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर बटाटा यावर रामबाण उपाय आहे. बटाट्यामुळे इन्फेक्शन कमी होईल.