Saturday, March 11, 2017

Pooja Room Rangoli Design by Satish Thavi Wedding Rangoli Design देवघरात काढायची रांगोळी





देवघरात काढायची रांगोळी .  केशरी आणि लाल रंग खास शुभ कार्य साठी आणि पवित्र ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी वापरण्याची पद्धत आहे, सहज सोपी आणि कमी वेळात काढता येईल अशी रांगोळी या व्हिडीओ मध्ये पहा

आरोग्यटीप 3

*प्रमुख आहारसूत्र*
Image result for lunch with table free images
*जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 3*
जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ?
काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ?
यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल.
दर दोन तास किंवा चार तासांनी सतत खात रहा, असे आज डाॅक्टरांकडून सांगितले जाते, नाहीतर म्हणे अॅसिडीटी वाढेल म्हणून खावे, असेही सांगितले जाते, असे रुग्ण सांगतात, डाएटीशियन तेच सांगतात, जिम इन्स्ट्रक्टर तेच सांगतात. मुळात प्राॅब्लेम इथेच सुरू होतोय. ज्यांना आरोग्य माहिती आहे त्यांना आहारशास्त्राची माहिती नाही. ज्या डाएटीशियनना आहारशास्त्र माहिती आहे, त्यांना आरोग्याची काहीही कल्पना नाही. आणि जिम इन्स्ट्रक्टरना फक्त प्रोटीन डाएट खपवणे एवढेच माहिती. बाकी त्यांना ओकी ठो माहिती नाही. पण आयुर्वेद तज्ञांना त्यांच्या सिलॅबसमध्ये दोन्ही शास्त्र शिकवली जातात. हेच आयुर्वेदाची प्लस बाजू.
आयुर्वेदात आहाराविषयीचे एक अत्यंत मह्त्त्वाचे सूत्र सांगितले जाते, ते म्हणजे "भूक असेल तेव्हा जेवावे, नसेल तर खाऊ नये." या सूत्राचा आधार घेऊन असे निश्चित सांगता येईल कि दर दोन चार तासांनी भूक नसली तर अजिबात खाऊ नये.
गॅस पेटलेला असेल तरच वर अन्न शिजेल ना. गॅस पेटलेलाच नसेल तर ? चमचाभर पाणी सुद्धा गरम होणार नाही. बरोबर आहे ना ? भूक नसताना जेवले तर अजीर्ण होईल. मग जेवायचेच कशाला ? सकाळ असो वा संध्याकाळ दुपार असो वा रात्र भूक नसताना अजिबात जेवू नये.
आयुर्वेद म्हणतो, वेगान् न धारयेत्
वेगान प्रवृत्तयेत् ।
शरीराकडून निर्माण केलेला वेग अडवू पण नये, किंवा त्याच्या मुद्दाम विरोधात जाऊ नये.
मग आज असे उलटे आणि चुकीचे का सांगितले जाते ?
ते मी कसं सांगू? मी सांगितले तर ते चुकीचे होईल ना.
 तो नास्ति मम अधिकारः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

आरोग्यटीप 2

*प्रमुख आहारसूत्र*
Image result for lunch with table free images
*जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 2*
रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे.
उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.
जेवण नेमके कोणत्या वेळी घ्यावे, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळाले नाही.पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली.
अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात,
प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु
प्रातराशो हि दूष्यति ।।
म्हणजे दिवसा सेवन केलेले अन्न सम्यक रितीने जर पचले नाही, आणि जर सायंकाळी भोजन केले तर विशेष हानी होत नाही.
पण सायंकाळी घेतलेले भोजन जर सकाळी पचले नसेल आणि सकाळी पुनः अन्न सेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.
अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे.
आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. *प्रातः आणि सायम्* प्रातःकाल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ.
इथे *दुपारी आणि रात्री* असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावे. यावरून असे लक्षात येते, की आपल्या दोन वेळा जेवायच्या. सकाळी आणि सायंकाळी.
हे काही आपल्याला जमणारे नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल तर कुछ ना कुछ करना तो पडेगा ।

आरोग्यटीप 3

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

Puran poli (Easy way) How to make Puran Poli

आरोग्यटीप 1

*प्रमुख आहारसूत्र*


*जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 1*
केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी.
नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे.
आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल......
......केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार मुळीच नाही. एक *आयुर्वेदभक्त* म्हणून जे योग्य असेल ते सांगण्याची, आणि जे अनुभवले आहे ते इतरांना वाटण्याची मला आवश्यकता वाटते. म्हणून लिहितोय. नाहीतर मी माझ्या व्यवसायात ठीक आहेच.
समर्थ म्हणतात,
*जे जे आपणास ठावे,*
*ते ते दुसऱ्यास सांगावे*
*शहाणे करूनी सोडावे*
*सकल जन.*
मी खूप सकारात्मक बदललोय. माझ्यातला बदल मलाच आश्चर्य वाटणारा आहे.
मी जे माझ्या स्वतःवर प्रयोग करतोय, जे गेली पंचवीस तीस वर्षे प्रत्यक्ष अनुभवतोय, जे माझ्या आयुर्वेदीय ग्रंथात वाचले आहे, जे माझ्या अनेक गुरूंकडून शिकलोय, जे माझे अनेक रूग्ण श्रद्धेने करत आहेत, त्यांच्यातील बदलाचे अनुभव परत येऊन सांगताहेत, ते फक्त शब्दबद्ध करून सांगतोय. काय लिहायचे, हे सुचवणारी, लिहवून घेणारी ती निसर्गशक्ती ( देव म्हटलं तरी काही जणांना पोटशूळ उठतो हल्ली.) मला सतत मदत करतेय, त्यामुळे हे लेखन कर्तृत्व माझे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.
कसं वागायचं, आणि ते कसं आचरणात आणायचं, स्वतःला कसं बदलायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कायदे करून सगळे प्रश्न सुटत नसतात, कायद्याची भीती दाखवून तर काहीच होत नसते. अहो, पूर्वी पोलीस म्हटले तरी भीती वाटायची. आता काही वाटेनासे झाले आहे. भीतीचा बडगा संपलाय. भारतीय विचार सरणी ही कायद्यापेक्षा पाप आणि पुण्याला जास्त घाबरते, ही वस्तुस्थिती आहे, ही भारतीय मानसिकता आहे. जे चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना सरळ मार्ग दाखवणे ही जर चुक असेल तर ही चुक मी वारंवार करेन.
धृतराष्ट्र आणि गांधारी प्रत्येक वेळी आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरुण घालत राहिली, चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत राहिली, म्हणून कौरव उन्मत्त झाले. आणि राजा असून देखील, संख्येने अधिक असूनही, स्वतः सकट स्वतःच्या कुळाचा सर्वनाश ओढवून घेतला. हा इतिहास विसरून कसा चालेल ?

आरोग्यटीप 2

चला, सावध होऊया.
त्या नीलकंठ शिवशंभुला शरण जाऊया.
आपल्या मनातील विद्वेषाचे विष नष्ट करूया.
अजूनही वेळ गेलेली नाही.
आयुर्वेद समजून घेऊन जगुया !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021