Wednesday, November 19, 2014

साडेसाती


साडेसाती  हा शब्द सहज उच्चारायलाही लोक भितात . आता माझ्या राशीला साडेसाती येणार ह्या नुसत्या कल्पनेनी लोकं अर्धी खचून जातात .
खरच का साडेसातीतच असताना आपल्याला त्रास होतो? साडेसाती नसते त्या वेळी खरच का आपल्याला एकही संकटाचा सामना करावा लागत नाही?
तर याच उत्तर "नाही " अस आहे . साडेसातीच्या केवळ कल्पनेने जर आपण व्याकुळ होऊ लागलो तर खरच साडेसाती आल्यावर आलेल्या संकटांचा सामना आपण योग्य रीतीने करू शकू का याचा विचार करणे गरजेचे आहे .  हे सर्व लिहिण्याच कारण - तुम्ही कधीऑनलाईन भविष्य सांगणाऱ्या साईट चा वापर केला असेल तर लक्षात येईल . काही दिवसां पूर्वी माझ्या एका मैत्रिणीने एका ऑनलाईन भविष्य सांगणाऱ्या वेबसाईट वर आपले नाव सर्व तपशीला सह रजिस्टर केले . संपूर्ण नवीन वर्षाच तुमच्या राशीच भविष्य फुकटात मिळेल असे लिहिल्या मुळे तिला सहजच भुरळ पडली . आपला ई -मेल रजिस्टर केला कि असे साईट वाले एकदाच सर्वसाधारण भविष्य फुकटात सांगून आपला कसा गैर फायदा घेतात याचे ती एक उत्तम उदाहरण ठरली . तिला हवे तसे वर्षाचे भविष्य लगेचच तिच्या ई -मेल वर मिळाले पण त्या नंतर त्या वेब साईट  वरून येणाऱ्या मेल ची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली . परंतु आता येणारे मेल हे तिला तीच जीवन जगण्यासाठी उपयोगी पडावे अशा भविष्याचे नसून अमुक एक ग्रह त्याचे स्थान बदलत असताना तिच्या जीवनात कशी उलथापालथ करणार आहे या बद्दल चे असत . अस ग्रह्संक्रमण होत असताना तुम्हाला काय करा आणि काय करू नका हे सांगण्या करिता असे भविष्यवेत्ते , प्रत्येक ग्रहा  मागे ठराविक त्या ग्रहाच्या दर्जा प्रमाणे भविष्य सांगण्याची किंमत आकारतात . काही वेळा हा ग्रह तुमच्या आयुष्यात कस छान घडवणार आहे आणि त्यातही आमच्याकडून मार्गदर्शन घेतल्यास तुम्हाला कस घबाड मिळेल अशा तर्हेचे  तर काही वेळा हा ग्रह तुमच्या आयुष्याची कशी वाट लावणार आहे आणि ते थांबवायचे असेल तर आमच्या कडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे अशा आशयाचे संदेश येत राहतात. साडेसाती संदर्भात एक अतिमहत्वाच्या अशा शनि ग्रहाबद्दल चा मेल तिला मिळाला . आता शनि आपल स्थान बदलत आहे आणि तुमच्या राशीला लवकरच साडेसाती सुरु होत आहे तेव्हा सावधान . तुम्ही येणाऱ्या संकटा  साठी तयार आहात का? लवकरात लवकर आमच्या खास साडेसाती बद्दल मार्गदर्शन देणाऱ्या  Package साठी पैसे भरा आणि मौल्यवान मार्गदर्शन मिळावा . (Package चा दर बघूनच माणूस धारातीर्थी पडतो ) . हे सगळं वाचून तीने आपला सुखाचा जीव दुक्खात लोटला . ती बेचैन झाली . तिला हातातलं काम सुचेना . माझ कस होणार साडेसातीत हा एकाच विचार ! कुणाला तरी या बद्दल सांगाव आणि जर वाटल तर त्या Package साठी पैसे भरावेत असा विचार तिने केला आणि हि गोष्ट तिने मला सांगितली .  मला विचारण्या आधीच ती पैसेही भरून मोकळी झाली होती पण त्या तथाकथित मार्गदर्शनाने ती आणखीनच कासावीस झाली होती. आता हे सगळ वाचल्यावर तुम्हीच सांगा ती साडेसाती पुढे केव्हा तरी सुरु होईल या वर तुमचा विश्वास बसतो आहे का? अहो कारण ती तिच्या मनात केव्हाच सुरु झाली होति. खर ना ?  या बद्दल तुम्हा सर्वांचा अनुभव काय? नक्की कळवा