Sunday, July 26, 2015

मोराची चिंचोली : भाग पहिला

नाचरे मोरा  आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच
अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर किती मौज येईल !आज शहरी जीवनात जगताना मुलांना आंब्याच्या वनाची आणि नाचणाऱ्या मोराची पुसटशी कल्पना करता येणहि फारच दुर्मिळ आहे . ज्या बच्चे कंपनीला कोकणातले आजोळ असेल किंवा गावी राहणारे आजी आजोबा असतील त्यांनी मोर नाही तरी आंब्याचे बन नक्की पहिले असेल पण गाव नसेल किंवा गावी आजोळ नसेल तरी या सर्वाचा निर्भेळ आनंद मुंबई आणि पुण्यातील लोकांना घेणे आता सहज शक्य झाले आहे .
मुंबई आणि पुण्या पासून जवळच "मोराची चिंचोली " या गावी फेरफटका मारलात तर हे सहज शक्य आहे . जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचा सुखद अनुभव घेत घेत , वाहणारे निर्झर  आणि हिरवळ याचा आस्वाद घेत घेत आपण मोराच्या चिंचोलीला येउन कधी पोचतो हे काळतही नाही . वाटेत दिसणारे मेंढपाळ आणि भली मोठी मेंढ्यांची झुंड वारंवार तुम्ही मुंबई सोडून छानश्या खेडेगावा कडे निघाले आहात याची साक्ष देतात .

Morachi Chincholi 

Morachi Chincholi

Morachi Chincholi 
 शुद्ध हवा , प्रदूषण रहित गाव आणि सुखद वातावरण मनाला मोह पाडते . हा प्रदेश तसा कमी पावसाचा असल्याने ठराविक पिक घेतली जातात पण आत्ता गेलात तर डाळींबाच्या ,केळ्याच्या बागा फुललेल्या दिसतात

. बाजरीची शेती दिसते . आणि या बरोबरच चिंच, कवठ आणि मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची डेरेदार झाडे पाहायला मिळतात . विस्तीर्ण आमराई आणि जुने वृक्ष यांच्या सावलीत झाडांना बांधलेल्या झोपाळ्याची मजा घेता येते.
या भागात कृषी पर्यटन विकास केंद्रांची स्थापनाही झाली आहे त्या अनुशंघाने औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात . मोराच्या चिंचोलीला जायचे असेल तर कुठे राहाल?

या पर्यटन केंद्रात एक रात्रीच्या राहण्याकरिता सोय उपलब्ध आहे . शाकाहारी जेवणाची सोय होते . तसेच राहण्या साठी नद्यांची नावे असलेली टुमदार कॉटेज राहायला दिली जातात .
 मोर पाहण्यासाठी खास मयुर कट्टा त्यांच्या शेताच्या आवारात बांधलेला आहे . मयुर पॉइट वरून आपण नाचरा मोर आणि लांडोरी पाहू शकतो . परंतु शेतात फिरून मोर पाहण्याचा आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याचा अनुभव  विरळाच असतो
© Kshama Bade
Peacock at the top of tree in Morachi Chincholi मोराची चिंचोली 


मोर पाहणे हा पक्षी निरीक्षणाचाच एक भाग आहे . या परिसरात साधारण अडीच हजार मोर आहेत त्यामुळे या भागात तुम्हाला सतत मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो . काही वेळा त्या आवाजा वरून ते फारच जवळ आहेत असा भास होतो . शेतात फिरून या मोरांच्या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतो .  नाचरा मोर , पिस स्वच्छ करणारा मोर , सकाळी झाडाच्या शेंड्या वर बसलेले अनेक मोर पाहायला मिळतात . मोराबरोबरच लांडोरीही फार मोठ्या संख्येत पाहायला मिळतात . शेतात तीन चार लांडोरी फिरताना दिसल्या तर समजावे कि मोर आसपासच  आहे .  मोर आणि लांडोर या दोघानाही उडताना पाहणे हे खरच दुर्मिळ दृश्य आहे . परतू मोराच्या चिंचोलीत असे अनुभव सहज मिळतात मोरांव्यातिरिक्त विविध प्रकारचे  पक्षी पाहायला मिळतात . बया पक्षी घरटी बांधताना आपण सहज पाहू शकतो
© Kshama Bade
मोराची चिंचोली बया पक्षी

म्हाळसाकांताच पुरातन मंदिरं आणि खेडेगावातील साध जीवन मनाला जीवनातील खऱ्या आनंदाची जाणीव करून देत आणि रोज आपल्या पैशांभोवती सजवलेल्या ध्येय वादाच्या मागे धावणारे आपण काही क्षण थांबून पुन्हा मनाला प्रश्न विचारतो कि खरच सुख म्हणजे नक्की काय असत ?लांबवर पसरलेली शेत , त्यात कष्ट करणारे शेतकरी पहिले कि मन कृतज्ञतेने भरून येत . त्यांच्या कष्टातून पिकणाऱ्या धान्यातून,भाजी पाल्यातूनच
आपले रोजचे पदार्थ तयार होत असतात . अशा शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि त्यांच्या जीवनशैलीला मनापासून सलाम !

मोराच्या चिंचोली पासून वीस किलोमीटर वर आणखी एक महत्वपूर्ण आणि निसर्गाचा अनोखा आविष्कार दाखवणार ठिकाण पाहायला मिळत निघोज कुंड /मळगंगा कुंड /रांजण खळगे अस त्यांना म्हटल जात . अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेले खळगे (पॉट होल्स ) इथे आपल्याला पाहायला मिळतात . फक्त त्यांच्याशी खेळ करण धोकादायक ठरू शकत . गावकरी अस सांगतात कि वरून छोटे  दिसणारे हे खळगे फार खोल असून त्यांना आतून भुयारे तयार झाली आहेत . एखादी व्यक्ती खळग्यात पडली तर पुन्हा बाहेर येऊ
शकत नाही .
रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड 
© Kshama Bade
रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड 

अष्टविनायकातील रांजण गावचा महागणपतीही इथून जवळच्या अंतरावर आहे . त्याचेही दर्शन आपण नक्की घेऊ शकतो . शिवाय शिक्रापूर पासून जवळच संभाजी महाराजांची समाधी हि पाहता येते . दोन दिवसाच्या या सफरीत शहरातील गोंधळ, कोलाहल ,प्रदूषण , दगदग , स्ट्रेस या पासून आपण अनेक योजने दूर जातो असा म्हणायला हरकत नाही
या लेखाच्या पहिल्या भागात आपण इथेच थांबू . दुसर्या भागात आणखी काही नवीन फोटो आणि विडीओ पाहण्यासाठी या ब्लोग ला जरूर भेट द्या पुढचा भाग पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल

Tuesday, July 14, 2015

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे - 
 पचन सुधारते 
जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते  या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.वजन घटवण्यास मदत होते 
जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते.  वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.  जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते.  टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.{1}
लवचिकता वाढवते 
पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.
मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते
जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.कुटुंबातील सदस्यांशी जवळीक  वाढते 
दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी  जवळीक वाढते.
 शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते 
शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व  सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.
दीर्घायुषी बनवते 
ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या{2} अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे.  कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.
गुडघे व  कमरेतील सांधे मजबूत होतात
 पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व  कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.
चंचलता कमी होते 
मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील  त्रास कमी होतात.
हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुधारतो 
काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ?  हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला  उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

Wednesday, July 1, 2015

लांब लांब रांग!

अजूनही आपल्या आसपास  किती जण फोन बिल / वीज बिल / विम्याचे हप्ते / महानगर पालिकेचे कर / बँक रिकरिंग किंवा पी पी फ चे पैसे रांग  लावून भरतात ? तर उत्तर असेल ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक . परवाच पोस्टात काही कामा करिता गेले असता तिकडे वीज बिल भरणार्यांची भली मोठी रांग पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं . आत्ताच्या युगात असे सगळे व्यवहार पार पाडण्यासाठी विविध पद्धतींचा सहज वापर करता येत असूनही आपण रांग लावण्यात
आपल्या वेळचा अपव्यय का करावा ? सहजच विचार मनात आला कि महिन्या भरात लोकं अशा किती ठिकाणी रांगेत उभे राहत असतील आणि असे उभे राहण्याचे तास मोजले तर किती होत असतील . मुख्य म्हणजे आयुष्याचे बरेचसे तास अश्या लोकांना रांगेत उभ राहवून वाया  दवडावे लागतात . काही वेळा तर अतिमहत्वाची कामे बाजूला सारून अंतिम देय तिथी नजीक आल्याने अशा रांगांना तोंड द्यावे लागते . अनेक  वेळा तर तासंतास उभ राहून आपली वेळ येताच खिडकी बंद होण्याची वेळ येते व त्या दिवशीचा सगळा वेळ  वाया जातो .
जे कुणी माझे हे विचार वाचत असाल त्यांना नक्कीच इंटरनेट वापरण्याची सवय असेल . आता तुम्हीच विचार
करा कि तुम्ही तुमचे जे व्यवहार अशा रांगा  टाळून करता येतील ते सगळे व्यवहार आधुनिक पद्धतीने पूर्ण करता का ? करत असाल तर उत्तमच पण करत नसाल तर लगेच विचार करा कि तुम्ही
आज पर्यंत रांगेत किती वेळ वाया  घालवलात ? आणि पुढेही किती वाया  घालवणार आहात ?
मी तर म्हणेन कि जर तुम्ही या सगळ्या व्यवहारांशी परिचित असाल तर आपल्या आस पास वावरणाऱ्या लोकांना याचे महत्व पटवून द्या/जमणार असेल तर त्यांना मदतही करा . ज्या योगे त्यांचाही वेळ वाया जाणार नाही आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जीवनात इतर  गोष्टी करण्याकरिता लागणारा वेळ आणि उर्जा ते वाचवू शकतील , त्यांचे स्वास्थ्य हि उत्तम राहील .  एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !