पालेभाजीमधे जवळजवळ 80 % पाणीच असते. उरलेला सगळा चोथा . पोषक अंश न के बराबर !
सकाळी ऊठल्यावर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी फायबरयुक्त पाला खावा ही पाश्चात्य धारणा !
आपल्याकडे ( भारतात) सालासकट कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ, नारळ, शेंगदाणे, फळभाज्या, अनपाॅलीश तांदुळ, अनरिफाईन्ड तेल असे अनेक प्रकार असल्याने मलप्रवृत्ती साफ न होणे ही समस्या नव्हती.
पालेभाज्या तुरट चवीच्या, वातुळ, पचायला जड असतात. न पचल्यामुळेच ढेकर सुध्दा त्या वासाची येते.
आणि बारीक होण्यासाठी पाला खात असाल तर आजपर्यंत म्हशी, रेडे, रानडुकर, गेंडे, ह्त्ती, इ. बारीक का नाही झाले. ?
विचार करा. स्वतः अनुभव घ्या.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
टीप :
काही पालेभाज्या औषधी आहेत, पण फक्त भारतीय विचारधारेतील वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. दररोज नकोच. आठवड्यातून एखादवेळी चालेल. त्याचाही नियम आहे.
पालेभाज्या वातकर आहेत म्हणून भाजी तयार करताना त्यात कोकम, चिंच, ताक, कांदा, लसुण, नारळ इ पदार्थ वापरावे लागतात.
पालेभाजी खायचीच झाली तर कशी खावी ? अष्टांग ह्रदय सूत्र 6/95 नुसार
स्विन्नं = उकडून घ्यावी
निष्पीडित रसं = रस काढून टाकून द्यावा.
स्नेहाढ्यम् = उरलेला चोथा भरपूर तेलात परतून घ्यावा.खावा.
नातीदोषलम् = म्हणजे फार दोष उत्पन्न करीत नाही.( एवढं करूनही थोडा दोष रहातोच ! )
भावप्रकाश या ग्रंथात तर स्पष्टच म्हटलंय,
शाकेषु सर्वेषु वसन्ति रोगास्ते हेतवो देहविनाशाय ।
तस्माद् बुधः शाकविवर्जनं तु कुर्यात।।
सर्व पालेभाज्यांमधे रोग रहातात, जे देहविनाशाचे कारण आहे. म्हणून बुध्दिमान माणसाने पालेभाजी खाणे सोडून द्यावे.
पुढे ते असंही म्हणतात की, पालेभाज्या या केवळ वातुळच नाहीत तर प्रज्ञाक्षय आणि स्मृतीघ्न ( बुध्दीला कमी करणार्या ) आहेत.
वृध्द चाणक्य ग्रंथातही 'शाकेन रोगा वर्धन्ते ' असं म्हटले आहे.
व्यवहारात अनेक प्रकारची अत्यंत विषारी कीटकनाशके पालेभाज्यांच्या मुळात घालतात आणि जीवघेणी रासायनिक खते पालेभाज्यांच्यावर फवारतात. बाहेरून कितीही धुतली तरी हे विष जात नाहीत.
याचा परिणाम म्हणून पालेभाज्यांना अजिबात किडपण लागलेली दिसत नाही.
सुश्रुताचार्य म्हणतात, पावसाळ्यात पालेभाजी खाणे म्हणजे पाण्यातील रोग वाढवणारे सर्व दोष पोटात जाणे.
आणि
मुंबईतील रेल्वेच्या बाजुला बारमाही होणार्या पालेभाज्या तर किती रोगट पाण्यावर वाढतात ?
एवढी विषाची परीक्षा कशासाठी ?
शाक म्हणजे फक्त पालेभाजी नव्हेच !
पत्रापासून कंदापर्यंत गुरू/ पचायला जड होतात. हे पण बरोबर !
पण जर सुयोग्य संस्कारीत केल्या तर !
आज सॅलेडच्या नावाने कच्च्या पालेभाज्या खायचे पाश्चात्य फॅड घुसले आहे. त्याकडे लक्ष असावे.
"हेल्थ अवेअरनेस" च्या नावाने कोणीही नाॅन मेडीकल काहीही सल्ले कोणाच्याही नावाने खपवत असतो.
आयुर्वेदातील जाणकार म्हणून याला कुठेतरी चाप बसणे आवश्यक वाटते.
ग्रंथातील कोणताही नियम, नियमावर बोट ठेवून पाळू नये असे ग्रंथकारच म्हणतात.
दूष्य देश बल काल..... अवस्थाश्च पृथग्विधः ।
आणि ग्रंथात वर्णन केलेल्या किती पालेभाज्या जश्याच्या तश्या शुध्द आज उपलब्ध आहेत. ?
--ज्यांची वर्णने आहेत त्यांची व्यापारी पध्दतीने, रासायनिक खतांनी पैदास केली जात नव्हती.
शेवग्याच्या शेंगा, वाल इ. शेंगावर्गातील,
वेलीला लागणार्या भोपळा, दुधी कोहाळा, इ.
कंदवर्गातील सुरण, बटाटा, कांदा, लसूण,
फळ स्वरूपातील वांगी, भेंडी इ.
सिझनल मिळणार्या फणस, नीरफणस, अंबाडी या भाज्या
किंवा रानात आपोआपच उगवणाऱ्या बांबूचा कोंब, पेवाची पाने, हादग्याची फुले, घोटीचा वेल, घोळूचा वेल, भारंगीची पाने, कुरडू, टाकळा, एकपानी, अळुचा देठ, करांद्याचा कंद, भुईआवळाचे पूर्ण झाड इ. भाज्या जरूर खाव्यात.
पण त्या शेपू पालक आणि कोबीच्या मागे आपण का लागतोय ? कळतच नाही.
ऋतुनुसार उगवणाऱ्या गावरान भाज्या देशविचार करून खाव्यातच!
व्यवहारात भाज्यांबद्दल किती गैरसमज करून दिले जात आहेत ?
वांगे वातघ्नी / वाताचा नाश करणारे असे वर्णन आहे. पण जर ते तेलात तळून घेतले तरच...
पाण्यात शिजवले तर वात वाढणारच !
आणि अग्निवर भाजून गुळ घालून केलेले वांग्याचे भरीत निद्राजनन सांगितले आहे.
योग्य मसाले वापरून, गावठी तेल वापरून, अग्निचा योग्य वापर करून भाज्यांच्या पाने फुले देठ वेल फळे, कंद, इ.चा वापर करून पराठे, धिरडी, भजी, भाजी, आमटी, इ. रूचकर पदार्थ करून खावेतच.
सर्वच भाज्या...
संस्कार बदलला की गुण बदलतात.
काळ बदलला की गुण बदलतात.
पण वैद्यांनी किंवा आपण आपली बुध्दी बदलू नये.
एक युक्ती
ज्या पालेभाजीची पाने कृमीकिटकांनी खाल्लेली आहेत निदान त्यांच्यावर तरी विषाची बाहेरून फवारणी झालेली नाही असे समजून किडींनी भोक केलेली वांगी आम्ही घरी आणतो. स्वच्छ करून किडलेला भाग काढून टाकून बाकीची भाजी वापरतो.
जेवढे शक्य आहे त्या भाज्या घरीच शेणखतावर उत्पादीत करतो. त्यासाठी एक गावठी गाय पोसतो.
शंभर वर्षे जगायचं तर एवढं केलंच पाहिजे ना !
सारासार विचार करून, व्यवहार लक्षात घेऊन, ग्रंथोक्त नियमांवर बोट न ठेवता, अति निग्रहाने, कुसंस्कारीत पालेभाज्या खाऊ नयेत.
हे माझे मत आहे.
वैद्य सुविनय दामले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹