COVID19 किंवा CARONA सध्याचा हा एकमेव "शब्द" ज्याने प्रत्येकाच आयुष्य त्याच्या हातात घेतलय. त्याची इच्छा असेल तिथे तो जाऊ शकतो, त्याची इच्छा असेल त्याला तो धाक दाखवून सोडून देतो आणि त्याची इच्छा असेल त्याला तो यम दुताच्या हवाली करतो.
काय गम्मत आहे पहा, मोक्ष प्रप्ती साठी अनेक मार्ग आहेत. सर्व धर्मांमधे त्यांच अस श्रद्धा स्थान आहे. स्वर्ग आहे की नाही माहीत नाही पण प्रत्येक धर्माची त्या वर श्रद्धा /विश्वास आहे. इतक सगळ असताना लोक ज्या कोणत्या धर्माच श्रद्धे ने पालन करताना दिसतात ते स्वर्गातच जातात की नाही या बद्दल शंका आहे . पण CORONA संसर्गजन्य रोग हे सिद्द करतो की तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका किंवा कोणत्याही धर्माचे असा पण मी तुमच्या वाट्याला आलो तर तुम्हाला यम सदनाला पाठवायचा माझा पुर्ण इरादा आहे बाकी वाचलात तर तुमच नशिब!
आता अशा वातावरणात आपण कस रहाण अपेक्षीत आहे?
सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की "चार गोष्टी युक्तीच्या" शिकवण्या साठीच CORONA आला आहे.
आपल्याला CORONA होइल का? या भितीत रोजचा दिवस ढ़कलण्यात काही अर्थ नाही. तर ज्या गोष्टिंचा आपण कधी विचारही केला नाही त्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून CORONA ला स्विकारायची वेळ आता आली आहे .
सर्व प्रथम आता एकट रहाण्याची सवय लावुन घेण गरजेच आहे. म्हणजे घरातल्यांना हाकलून द्यायच का की स्वत: बाहेर पडायच? तर या पैकी काहीच नाही. आपल्या माणसांच्यात राहून एकट रहण्याची कला आत्मसात करता येण गरजेच आहे.
माणुस कशाचा भुकेला आहे तर आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचा. हे आनंदाचे क्षण कधी एखाद्या व्यक्ती मुळे मिळतात किंवा एखाद्या जागे मुळे मिळतात किंवा एखाद्या पदार्था मुळे मिळतात व अशा अनेक गोष्टिन मुळे मिळतात आणि आपण त्या गोष्टींच्या प्रेमात पडतो. पण COVID19 आपल्याला थोडा वेगळा संदेश देतो. तो आपल्याला असे आनंदाचे क्षण फक्त स्वता साठी स्वत:च निर्माण करयला शिकवतो. त्यामूळे आपला आनंद इतर कोणत्याही गोष्टींवर अवलंबून न रहाता आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी होऊ शकतो. आता कसे ते पहा.....
तो सर्वां पासून लांब रहायला सांगतो... म्हणजे एकट रहायलाच सांगतो. पण त्यात आपल्याच माणसांच्या सुरक्षेचा आनंद दडला आहे.
तो आपल्याला स्वछते च्या सवयी शिकवतो. म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ शरीराचा आनंद घेता येतो.
तो आहारात बदल सुचवतो. आणि उत्तम आरोग्याची हमी देतो. त्यामूळे उत्तम प्रकृती चा आनंद घेता येतो.
तो व्यायाम करयला सांगतो. आंणि आपल्याला सुदृढ शरीराचा आनंद घेता येतो.
तो घराबाहेर कारणा शिवाय पडू नका असे सुचवतो आणि आपल्याला आपल्यातील संयमी वृत्तीची जाणिव करुन देतो. इतर वेळी कधिही आपल्या संयमाची कसोटी न घेतलेले आपण मनातल्या मनात आपल्याच संयमी वृत्ती वर खुश होतो आणि आनंदाने स्वत:ची पाठ थोपटतो. 😀
तो घरच्या अन्नाच महत्व सांगतो . आपल्यालाही घरातल्या अन्नाची गोडी उमगून येते. अशा सात्विक अन्नामुळे न जाणो कशा शरिरात आनंदच्या लहरी फिरु लागतात. आणि तोच आनंद स्वत:तही जाणवू लगतो.
तो नियमांच पालन करयला सांगतो. पुर्वी सोयीस्कर पणे सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करणारे आपण सजग होतो. आयुष्याच्या प्रत्येक कृतीत आपला सहभाग वाढु लागतो आणि आपणच आपण दिलेल्या प्रतिसादावर आनंदाने अचंबित होतो.
तो काटकसर करयला सांगतो. सहजच त्याच्या येण्याने मी माझ्या खर्चाचा ताळेबंद मांडतो आणि लक्षात येत की मी खर्चात योग्य गोष्टी मधे कपात करुन, बचतीच्या एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती घेतो.
तो आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ देतो. फक्त स्वत: साठी जगताना समज्याचा विसर पडलेले आपण जमेल ती मदत इतराना करण्याचा आनंद तो आपल्याला देतो. इतकच नाही तर कुणासाठी काहितरी करता येइल इतक अधीच आपल्याला देणार्या त्या परमेश्वरा कडे कृतद्न्यता व्यक्त करण्याचा आनंद ही तो आपल्याला देतो.
जे शिकण्यासाठी तुमच्या कडे वेळ नव्हता ते पुर्णपणे एक चित्ताने शिकण्यतला आनंद तो देत आहे
मैत्रिणीनो आणि मित्रानो.... खर सांगते कोविड19 हे निमित्त आहे पण आयुष्य खर्या अर्थाने बदलायची गरज आहे. हा बदल एकट्याने कुठल्याही आजराच्या दबावा खाली नव्हे तर समर्पण भावनेने जर लवकर स्विकाराल तर कुणाच्याही असण्या किंवा नसण्या शिवाय आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता येइल. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरुन जाईल.