१ एक कप आमरस घट्ट
२ एक कप साय
३ एक कप मिल्क पावडर
४ एक कप निरसं दूध
५ दोन ते तीन टेबल स्पून पिठी साखर
कृती
वरील सगळे मिकसरमधून नीट मिसळून घ्या. हे मिश्रण प्लास्टिक च्या पसरट डब्यात ओतून घ्या. ह्या डब्याचा झाकण न लावता त्यावर एखादी स्टील ची ताटली ठेवा आणि फ्रिझर मध्ये मॅक्सीमम थंडाव्यावर सेट करायला ठेवा. सेट झालं की थोडा वेळ बाहेर काढून ठेवा मग त्याचे चमच्याने तुकडे करून अर्धवट वितळलेले आइस्क्रीम स्मूथ होई पर्यंत मिकसरमधून फिरवून घ्या. पुन्हा सेट करण्या साठी त्याच प्लास्टिक च्या डब्यात हे मिश्रण ओता आणि वाटी भर आंब्याच्या बारीक फोडी नीट मिसळा. आता आइस्क्रीम पुन्हा सेट करायला फ्रीझर मध्ये ठेवा फक्त आत्ता फ्रीझर चा थंडावा मॅक्सिममवर ठेउ नका तर त्या पेक्षा थोडा कमी वर ठेवा. त्यामूळे आइस्क्रीम स्मुथ होईल.
No comments:
Post a Comment