Saturday, March 11, 2017

आरोग्यटीप 2

*प्रमुख आहारसूत्र*
Image result for lunch with table free images
*जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 2*
रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे.
उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.
जेवण नेमके कोणत्या वेळी घ्यावे, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळाले नाही.पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली.
अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात,
प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु
प्रातराशो हि दूष्यति ।।
म्हणजे दिवसा सेवन केलेले अन्न सम्यक रितीने जर पचले नाही, आणि जर सायंकाळी भोजन केले तर विशेष हानी होत नाही.
पण सायंकाळी घेतलेले भोजन जर सकाळी पचले नसेल आणि सकाळी पुनः अन्न सेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.
अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे.
आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. *प्रातः आणि सायम्* प्रातःकाल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ.
इथे *दुपारी आणि रात्री* असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावे. यावरून असे लक्षात येते, की आपल्या दोन वेळा जेवायच्या. सकाळी आणि सायंकाळी.
हे काही आपल्याला जमणारे नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल तर कुछ ना कुछ करना तो पडेगा ।

आरोग्यटीप 3

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

Puran poli (Easy way) How to make Puran Poli

आरोग्यटीप 1

*प्रमुख आहारसूत्र*


*जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 1*
केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी.
नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे.
आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल......
......केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार मुळीच नाही. एक *आयुर्वेदभक्त* म्हणून जे योग्य असेल ते सांगण्याची, आणि जे अनुभवले आहे ते इतरांना वाटण्याची मला आवश्यकता वाटते. म्हणून लिहितोय. नाहीतर मी माझ्या व्यवसायात ठीक आहेच.
समर्थ म्हणतात,
*जे जे आपणास ठावे,*
*ते ते दुसऱ्यास सांगावे*
*शहाणे करूनी सोडावे*
*सकल जन.*
मी खूप सकारात्मक बदललोय. माझ्यातला बदल मलाच आश्चर्य वाटणारा आहे.
मी जे माझ्या स्वतःवर प्रयोग करतोय, जे गेली पंचवीस तीस वर्षे प्रत्यक्ष अनुभवतोय, जे माझ्या आयुर्वेदीय ग्रंथात वाचले आहे, जे माझ्या अनेक गुरूंकडून शिकलोय, जे माझे अनेक रूग्ण श्रद्धेने करत आहेत, त्यांच्यातील बदलाचे अनुभव परत येऊन सांगताहेत, ते फक्त शब्दबद्ध करून सांगतोय. काय लिहायचे, हे सुचवणारी, लिहवून घेणारी ती निसर्गशक्ती ( देव म्हटलं तरी काही जणांना पोटशूळ उठतो हल्ली.) मला सतत मदत करतेय, त्यामुळे हे लेखन कर्तृत्व माझे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.
कसं वागायचं, आणि ते कसं आचरणात आणायचं, स्वतःला कसं बदलायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कायदे करून सगळे प्रश्न सुटत नसतात, कायद्याची भीती दाखवून तर काहीच होत नसते. अहो, पूर्वी पोलीस म्हटले तरी भीती वाटायची. आता काही वाटेनासे झाले आहे. भीतीचा बडगा संपलाय. भारतीय विचार सरणी ही कायद्यापेक्षा पाप आणि पुण्याला जास्त घाबरते, ही वस्तुस्थिती आहे, ही भारतीय मानसिकता आहे. जे चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना सरळ मार्ग दाखवणे ही जर चुक असेल तर ही चुक मी वारंवार करेन.
धृतराष्ट्र आणि गांधारी प्रत्येक वेळी आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरुण घालत राहिली, चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत राहिली, म्हणून कौरव उन्मत्त झाले. आणि राजा असून देखील, संख्येने अधिक असूनही, स्वतः सकट स्वतःच्या कुळाचा सर्वनाश ओढवून घेतला. हा इतिहास विसरून कसा चालेल ?

आरोग्यटीप 2

चला, सावध होऊया.
त्या नीलकंठ शिवशंभुला शरण जाऊया.
आपल्या मनातील विद्वेषाचे विष नष्ट करूया.
अजूनही वेळ गेलेली नाही.
आयुर्वेद समजून घेऊन जगुया !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

Monday, February 13, 2017

How to draw Rangoli with two colours at a time



एका वेळी दोन रंग वापरून काढलेली रांगोळी. जलद व रंगीत रांगोळी काढण्या साठी या रांगोळी पद्धतीचा वापर केला जातो.

रंग संगती उत्तम साधता यावी , काम जलद व्हावे आणि रंग सहज घालता यावे या साठी अशा  पद्धतीनें रांगोळी सराव केल्यास

रांगोळी काढण्यात सहजता येईल . जास्त माहिती साठी , रांगोळी वर्गांसाठी तसेच रांगोळी डीव्हीडी खरेदी करण्यासाठी

ला संपर्क करा 8108101524

Visit www.facebook.com/RangoliArt


Friday, May 27, 2016

आजची आरोग्यटीप (आंघोळीपूर्वी काय काय करावे ? -1)


लहान सहान अवयवांची शुध्दी आंघोळीपूर्वी करून घ्यावी.
या क्रमाला महत्व आहे.
जसे मलमूत्रविसर्जन हे आंघोळीपूर्वीच व्हायला हवे. नखे कापणे, दाढी करणे, दात घासणे, नाक, कान, डोळे साफ करणे, या गोष्टी आंघोळीपूर्वीच झाल्या पाहिजेत.
आता जसा वेळ मिळेल तसच्या जमान्यात यातील कोणतीही कृती केव्हाही केली जाते. मग जंतुसंसर्गाची शक्यता वाढणारच ना !
स्वच्छता आणि शुचीता या गोष्टी शरीराशी संबंधित आहेत. यासाठीच काही स्वच्छतेच्या कृती करायला सांगितल्या आहेत.
शरीर, मन, आत्मा आणि इंद्रियांना रोग होतात, त्याचे एक कारण यांची अशुद्धी होय.
मनुस्मृति मधे बारा प्रकारचे मल सांगितले आहेत. शरीरातून बाहेर पडणारे रक्त, मांस, वीर्य, मूत्र, विष्ठा, नाकातील मळ, कानातील मळ, नखे, तोंडातून बाहेर पडणारा चिकटा, अश्रू, डोळ्यातील मळ, आणि घाम यांना लवकरात लवकर शरीरावरून दूर करावे.
या प्रत्येकाची शुद्धी पाण्याने आणि मऊ मातीने, रखेने, विभूतीने किंवा चणाडाळीच्या पीठाने करावी. ही झाली स्थूल शरीरशुद्धी !
मनाच्या शुद्धीकरणासाठी यम, समाजाच्या शुद्धीसाठी नियम, इंद्रिय शुद्धीसाठी संयम आणि आत्मशुद्धि साठी पावित्र्य राखून भावपूर्ण केलेले नामस्मरण या गोष्टींनी मन, इंद्रिय आणि आत्मा यांचीही शुद्धी करावी.
जसं केवळ घरातला केर काढून पुरत नाही, बाहेरचा केर पुनः घरात येतो म्हणून घरातील स्वच्छतेबरोबरच घराबाहेरील अंगणाची स्वच्छताही केली पाहिजे. तेवढेही पुरणारे नाही.रस्ताही स्वच्छ पाहिजे. गाव स्वच्छ हवा, देशही स्वच्छच हवा. यासाठी वेगवेगळे उपक्रम प्रत्येकाने हाती घेणे आवश्यक आहे.
देश शुद्धी झाली तर देह शुद्धीचे महत्व !
वैद्य सुविनय दामले.

Saturday, May 7, 2016

फोडणीची पोळी

फोडणीची पोळी कुणा कुणाला आवडते ? मला जरा जास्तच आवडते.
कांद्याची आणि मिरचीची  चटकदार फोडणी दिली कि झटक्यात पोळीचा
खमंग पणा वाढतो आणि प्रत्येक घास खुसखुशीत आनंदाचा नवा अनुभव
देऊन जातो . काही जण यालाच पोळीची उसळहि  म्हणतात .  पण काही
मिनिटात तयार होणारा हा पदार्थ तितक्याच पटकन संपतोही.
पहा तुम्हाला कशी वाटते मी केलेली फोडणीची पोळी


Sunday, April 3, 2016

चैत्रांगण : सुंदर रांगोळी

चैत्रांगण : सुंदर रांगोळी
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते.
 लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.
अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.
गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.
अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते. 


Saturday, March 26, 2016

7/12 सात बारा

पूर्वीची माहिती ही असली तरी जमीन महसुल अधिनियम १९६६ नुसार .... जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय.जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 नमुने अशी विभागणी केलेली असते. त्यातील 7 नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर 12 नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण 7/12 मध्ये केलेले असते.

7/12 संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी:

1) 7/12 हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.

2) 7/12 बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.

3) 7/12 ची नविन पुस्तके साधारणता 10 वर्षानी लिहिली जातात.

4) 7/12 तील मालकी व इतर हक्का च्या ठिका नी कोण तेही महत्वाचे लिखान हे फेरफार नोंद के ल्या शिवाय ये वू शतेकत नाही. गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही.

5) प्रतेक वेळी 7/12 काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.

अदभुत विहीर....बारा मोटेची विहीर... कि भुयारी राजवाडा ?

अदभुत विहीर....बारा मोटेची विहीर... कि भुयारी राजवाडा ?
विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर चढून आलो आणि पाहिला तर इथे सिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीर आहे.शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.