Sunday, February 24, 2013

नाद हा शब्द किती विविध अर्थी वापरला जातो. 
डमरू चा नाद ईश्वराची आठवण करून देतो तर 
विषय विकारांचा नाद किंवा व्यसनांचा नाद 
माणसाचे जीवन उध्वस्त करत असतो. काहीवेळा 
काही व्यक्तींच्या संगतीचा नाद तुमचे जीवन 
घडवतो किंवा उध्वस्तही करतो. घरातील भांड्यांचा
नाद आपण वाईट समजतो आणि तो घरा बाहेर
जाणार नाही याची काळजी घेतो. म्हणून नाद या
शब्दात दडलेय सातत्य या क्रियेचा विचार आपण
केला पाहिजे आणि आपण योग्य गोष्टीच्या नादी लागून म्हणजेच योग्य गोष्टीत आपले मन गुंतवून स्वतःचा उद्धार केला पाहिजे

No comments:

Post a Comment