Sunday, February 24, 2013


समाधानाने दिलेल्या आशीर्वादाचे दोन शब्द मनाला सुखावून
जातात. आंतरिक सुख मिळवण्यासाठी समाधानी असणे
आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात इतरांना समाधान मिळवून
देणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. मनापासून केलेले
कोणतेही काम हृदयाला भिडते आणि समाधानाची पालवी
तिकडेच डोकावते. आशीर्वाद हे दुसरे तिसरे काही नसून
समाधानाची पोचपावती असते. परंतु मोकळ्या मनाने
या सर्वाचा अनुभव घेत यावा लागतो करण आपण
आनंदी व समाधानी असू तरच याची खरी किंमत कळते.

No comments:

Post a Comment