Sunday, February 24, 2013

जीवनातील साधेपणा अनुभवावा लागतो. आर्थिक सुबत्ता 
असल्यास मनुष्य ज्या प्रमाणे सर्व सुखसुविधांचा लाभ 
घेऊन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा वेगळा 
असा निष्पाप, निरागस, निर्मल आनंद साध जीवन जगण्यात 
अनुभवता येतो. हि गोष्ट वाटते तितकी सोपी नसली तरी जगावेगळी नाही. स्थळ, काळ आणि परिस्थिती यांचे भान ठेवून वागल्यास आपण जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींतही मोठा
आनंद मिळवू शकतो यात शंका नाही .

No comments:

Post a Comment