भवताली घडणार्या घटना काही वेळा मनाला बेचैन करून जातात. काही वेळा आपणही अशा गोष्टींसाठी नकळत कारणीभूत तर नाही न असा विचारही करायला लावतात. वाईट गोष्ट घडली कि सर्व दहा तोंडानी बोलतात, कीस पडतात आणि काही काळाने सर्व विसरून जातात. परंतु खऱ्या अर्थाने आपण त्यातून काय शिकलो आणि आपण आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल केले या बद्दल आपण एकमेकांशी कधीच बोलत नाही. कारण आपण अवलंबलेले धोरण हे कदाचित समोरच्याला आवडेल असे नाही किंवा तो आपल्याला पुरोगामी समजेल अशी भीती मनात असते. घटना घडून गेल्या नंतर जीवनात
घडवलेल्या बदलांवर चर्चा होणे गरजेचे आहे. कारण ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. दुसर्यांना सतत दोष देऊन आपण भवताली योग्य ते बदल घडवून आणू शकत नाही त्या साठी आपल्यालाहि काही नियम, शिस्त, सकारात्मक विचार अंगीकारावे लागतात.

No comments:
Post a Comment