Sunday, February 24, 2013

क्षणा क्षणा ने आयुष्य निघून जाते आहे. निरव 
शांततेत स्वतः चा वेध घेताना हे लक्षात 
येते आहे. अरे , आयुष्यात असे कित्येक क्षण 
निघून गेले पण जाता जाता मनावर अनेक 
संस्कार करून गेले. काही चांगल्या काही वाईट 
आठवणी देऊन गेले. चांगलं ते घ्यावं आणि
वाईट ते सोडावं असं जाताना कायम सांगून
गेले. ते आपल्याला किती जमले त्याचा हिशोब
करायचा नाही कारण आता येणारा
एकही क्षण आपल्याला फुकट दवडायचा नाही.
गेलेल्या क्षणातून जे शिकलो ते योग्य तर्हेने
अमलात आणू, येणाऱ्या प्रत्येक क्षणाला
कृतार्थतेने जगण्याचा प्रयत्न करू.

No comments:

Post a Comment