Sunday, February 24, 2013

बहुतेक वेळा परिस्थिती बदलली कि माणसं बदलतात. प्रत्येक 
वेळी हा बदल वाईट असेल अस नाही परंतु हे बदलणं प्रत्येक 
व्यक्तीच्या आयुष्यात वेगळ्या प्रकारे अनुभवला येत. काही वेळा 
तुमची परिस्थिती वाईट असताना तुमच्या बद्दल फारच 
आपुलकी (कोरडी) दाखवणारी माणसं परिस्थिती सुधारली 
कि दूर निघून जातात. कारण त्यांना दूर राहून तुमची होणारी 
तारांबळ पाहण्यात रस असतो ,जी परिस्थिती सुधारली कि 
थांबते. याउलट खरी आपुलकी असलेली माणसं तुम्हाला प्रोत्साहन देतात, वेळ प्रसंगी आधार देऊन त्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यास मदतही करतात. तुमच्या सुधारलेल्या परिस्थितीने त्यांना आनंद होतो आणि पुढे तुमच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाट असतो. या साठी आपल्या वाईट काळात आपण घेत असलेली मदत हि योग्य व्यक्तींकडून आहे कि नाही याचे भान ठेवणे गरजेचे आहे. दुक्ख सोसावे लागू नये म्हणून जमेल तेवढा सोपा मार्ग स्वीकारण्याची वृत्ती ठेवणे चुकीचे आहे. चांगल्या परिस्थितीत लोकांनी दुरावा ठेवला तरी मनुष्य सहन करू शकतो पण वाईट परिस्थितीत ज्यांच्या वर विश्वास ठेवावा अशांनी विश्वासघात केला तर मनुष्य पार खचून जातो.तेव्हा सर्व परिस्थितीत स्वतःचा विश्वास ढळू न देणे आणि योग्य मार्ग क्रमित राहणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय असणे गरजेचे आहे

No comments:

Post a Comment