Kedarnath |
सध्या दूरदर्शन वर आपण केदारनाथ आणि आसपासच्या परिसरातील दुर्घटनेच्या बातम्या
सतत पाहत आहोत. अनेक उध्वस्त झालेली कुटुंब आणि त्यांचे आक्रोश मन अस्वस्थ
करत आहेत. काही क्षणात होत्याच नव्हत झालं आणि एकच क्रंदन सुरु झालं . हि भीषण
अवस्था पाहिल्यावर एक गोष्ट पटली कि आपणच आपले शत्रू बनलो आहोत. आपला
वाढता हव्यास, जीवनीतील भौतिक सुखांकडे आपला वाढत असलेला अवास्तव
कल , पुढच्या पिढ्यांचा विचार न करण्याची आपली वाढती मानसिकता , वाढता चंगळवाद
आणि त्यामुळे वाढणारी आपापसातील स्पर्धा !
प्रत्येक दिवसागणिक जितक जास्त भौतिक सुख मला मिळालं तितक खर्या अर्थाने मी
जीवन जगलो अशी जर आपली मानसिकता असेल तर ती लवकरच आपल्याला आपल्या
नाशाकडे घेऊन जाईल यात शंका नाही . वेळ आली आहे ती योग्य विचार करण्याची …
भविष्याचा विचार न करता माणसाने निसर्गावर असेच अतिक्रमण चालू ठेवले तर
हा सहनशील निसर्गही असे रुद्र रूप वारंवार दाखवल्याशिवाय राहणार नाही .
निसर्ग हि ईश्वरी देणगी आहे आणि तीच संगोपन आणि योग्य तर्हेने उपयोग करणे
आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. अधिकाराच्या , सत्तेच्या
आणि श्रीमंती च्या मागे लागलेले आपण सर्वजण आज सोयीस्कर रित्या आपली
कर्तव्य विसरत आहोत . आणि याचे परिणाम आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे
लागतील यात शंका नाही .