केवळ पाच मिनिटात तुम्ही शांत झोपेतून जागे होऊन सकाळच्या गार हवेत
फिरायला जाण्यासाठी तयार होऊ शकता .
केवळ पाच मिनिटात टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद तुम्ही नीटनेटके
करून काम करण्यासाठी टेबल स्वच्छ करू शकता .
केवळ पाच मिनिटात राग आणि नैराश्यातून बाहेर पडून तुम्ही नवा निर्धार करू शकता .
नव्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता .
केवळ पाच मिनिटात तुम्ही नकारात्मक विचार सकारात्मक करू शकता .
पाच मिनिटं हा जास्त कालावधी नाही . ती पटकन निघून जातात .
परंतु पाच मिनिटाच्या या काळात तुम्ही बरच काही पार करून जाता .
नव्याने विचार करू लागता . विचारांची दिशा बदलायला कष्ट नक्कीच लागतात पण फार वेळ लागत नाही . केवळ पाच मिनिटात तुम्ही निष्फळ विचारांतून बाहेर पडून , असा बदल घडवू शकता जो आयुष्यात पुढे जाऊन तुमचे हित करेल . जे करणं गरजेच आहे अशा प्रत्येक गोष्टी करता पाच मिनिट द्या, योग्य विचार करा . त्या पाच मिनिटात केलेला एक सकारत्मक विचार तुमच आयुष्य बदलू शकतो. स्वतः साठी दिलेली अशी पाच मिनिटं आयुष्यात एक चिरकाल टिकणारा आनंद देऊ कतात .
बघा जमत का !
No comments:
Post a Comment