जे काही भूतकाळात घडून गेल आहे, तसच आताही घडत राहील असं नाहि. कारण या क्षणी
जे घडत आहे त्याची दिशा बदलण्याची संधी तुम्हाला आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रद
प्रवास सुरु केला असेल आणि योग्य दिशेने पावले उचलली असतील तर तुम्ही प्रगतीचा वेग वाढवू शकाल . तुम्ही भूतकाळात काही अडचणी किंवा नैराश्य अनुभवलं असेल तर नव्या दिशेनी जाण्याची हीच वेळ आहे.
जे काही घडून गेलं त्यावर विचार करत बसलात तर तुम्ही त्यातच गुंतून राहाल . त्यापेक्षा
योग्य दिशेने पावले उचला . "झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा " हे वाक्य सार्थक करण्याचा
प्रयत्न करा .
आजचा दिवस नवा आहे . तो नव्याने उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न करा . थोडक्यात
म्हणजे हा तुमचा दिवस आहे . जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्या करता मदत करणार
आहे .
भूतकाळातील वाईट गोष्टींतून बाहेर पडण्याकरिता बरेच कष्ट आणि सातत्य लागेल परंतु
त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता . भूतकाळातील दुक्खांच्या गर्तेत अडकण्या पेक्षा
भविष्य काळ उज्वल करण्या करिता पाऊले उचलणे केव्हाही श्रेयस्कर!
जस जसे तुमचे यश नजरेच्या टप्प्यात येऊ लागेल , भूतकाळातील दुख्खांचे चटके कमी
होऊ लगतिल. दूरदर्शी व्हा आणि लक्षात ठेवा तुम्ही नक्कीच भविष्यातील प्रत्येक दिवस
एक नवा उत्तम दिवस म्हणून जगू शकता .
No comments:
Post a Comment