Saturday, June 14, 2014

गरिबी आणि श्रीमंती




Sun & Rain


जीवनात गरिबी आणि श्रीमंती हा उन पावसाचा खेळ आहे .  गरिबी जीवन घडवायला शिकवते तर श्रीमंती जीवन जगायला शिकवते. 
गरिबीत सांभाळलेला प्रामाणिकपणा  श्रीमंतीत सन्मान,आदर मिळवून देतो .  गरिबी आणि श्रीमंती ह्या जीवन चक्राशी निगडीत गोष्टी आहे. 
या दोन्ही परिस्थितीत आपल्याला सतत साथ देते ते आपले आरोग्य / आपली तब्बेत ! 

गरिबीत आपण प्रयत्नपूर्वक मन शांत, समाधानी  आणि प्रसन्न ठेवून 
स्वतःच्या आणि आपल्या बरोबार्च्यांच्या तब्बेतीची नकळत काळजी घेत असतो . 
व्यायाम करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी पैशांची 
आवश्यकता नसते तर आरोग्यदायी जीवन जगण्याची तळमळ आणि इच्छा असण्याची गरज असते .
 वाईट परिस्थितीत स्वतःला आणि परिवाराला दुक्खी करण्यापेक्षा , असेल त्या परिस्थितीत सर्वांचे आरोग्य / स्वास्थ्य (मानसिक आणि शारीरिक ) कसे उत्तम राहील या कडे लक्ष देणे फार गरजेचे असते . असे आरोग्याच योग्य विचार,  योग्य निवड आणि परिस्थितीला सामना करण्यासाठी  लागणारी उर्जा आपल्याला पुरवत असते आणि त्याच जोरावर आपण आपले जीवन सोपे करू शकतो .  

गरिबीत घेतलेली तब्बेतीची काळजी नवीन स्वप्ने 
पूर्ण करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न , धाडस , निर्भीडता वाढवण्यासाठी मदत करते तर श्रीमंतीत असे उत्तम आरोग्य अनेक गोष्टींचा तर तम भाव सांभाळून आनंदी जीवन उपभोगायची संधी देते. प्रत्येक दुक्खाच्या चक्रा  नंतर एक सुखाचे चक्र सुरु होते या वर विश्वास ठेवला तर मला वाटत समोर येईल त्या परिस्थितीला आपले वैयक्तिक आरोग्य सांभाळून आपण सहज सामोरे जाऊ शकतो . म्हणूनच आरोग्य हि सुखाची गुरुकिल्ली आहे आणि तीच खरी श्रीमंती आहे .