Showing posts with label आव्हाने. Show all posts
Showing posts with label आव्हाने. Show all posts

Saturday, June 14, 2014

गरिबी आणि श्रीमंती




Sun & Rain


जीवनात गरिबी आणि श्रीमंती हा उन पावसाचा खेळ आहे .  गरिबी जीवन घडवायला शिकवते तर श्रीमंती जीवन जगायला शिकवते. 
गरिबीत सांभाळलेला प्रामाणिकपणा  श्रीमंतीत सन्मान,आदर मिळवून देतो .  गरिबी आणि श्रीमंती ह्या जीवन चक्राशी निगडीत गोष्टी आहे. 
या दोन्ही परिस्थितीत आपल्याला सतत साथ देते ते आपले आरोग्य / आपली तब्बेत ! 

गरिबीत आपण प्रयत्नपूर्वक मन शांत, समाधानी  आणि प्रसन्न ठेवून 
स्वतःच्या आणि आपल्या बरोबार्च्यांच्या तब्बेतीची नकळत काळजी घेत असतो . 
व्यायाम करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी पैशांची 
आवश्यकता नसते तर आरोग्यदायी जीवन जगण्याची तळमळ आणि इच्छा असण्याची गरज असते .
 वाईट परिस्थितीत स्वतःला आणि परिवाराला दुक्खी करण्यापेक्षा , असेल त्या परिस्थितीत सर्वांचे आरोग्य / स्वास्थ्य (मानसिक आणि शारीरिक ) कसे उत्तम राहील या कडे लक्ष देणे फार गरजेचे असते . असे आरोग्याच योग्य विचार,  योग्य निवड आणि परिस्थितीला सामना करण्यासाठी  लागणारी उर्जा आपल्याला पुरवत असते आणि त्याच जोरावर आपण आपले जीवन सोपे करू शकतो .  

गरिबीत घेतलेली तब्बेतीची काळजी नवीन स्वप्ने 
पूर्ण करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न , धाडस , निर्भीडता वाढवण्यासाठी मदत करते तर श्रीमंतीत असे उत्तम आरोग्य अनेक गोष्टींचा तर तम भाव सांभाळून आनंदी जीवन उपभोगायची संधी देते. प्रत्येक दुक्खाच्या चक्रा  नंतर एक सुखाचे चक्र सुरु होते या वर विश्वास ठेवला तर मला वाटत समोर येईल त्या परिस्थितीला आपले वैयक्तिक आरोग्य सांभाळून आपण सहज सामोरे जाऊ शकतो . म्हणूनच आरोग्य हि सुखाची गुरुकिल्ली आहे आणि तीच खरी श्रीमंती आहे . 



Tuesday, May 7, 2013

आजचा दिवस वेगळा आहे !

जर जीवन चांगल आहे तर आजचा दिवसही चांगला  आहे. 
जर जीवनात अडचणी  असतील तर आजचा दिवस अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन कृती करण्याचा व त्यातून अनुभव संपन्न होण्याचा आहे. 
तुमच्या समोर काहीही असले तरी आजचा दिवस वेगळा आहे.  आणि तुम्ही तो तुमच्या कृतीने आगळा वेगळा घालवण्याचा प्रयत्न करू शकता . 
तुमच भविष्य तुमच्या भूतकाळावर ठरत नसून ते तुमच्या भविष्यातील अपेक्षांवर ठरत असते. आज तुम्ही  एका उच्च पातळी  पर्यंत  त्या अपेक्षांची कल्पना मनात द्रुढ केली पहिजे. आजचा  दिवस हा अनेक आव्हानांनी आणि सचोटीने परिपूर्ण आहे.  अशा आव्हानांचा सामना करण्याचा संकल्प करा आणि त्यातून मार्ग काढा . 
आजचा  दिवस वेगळा आहे !त्याला  एका योग्य  विचाराने, औत्सुक्याने , शिस्तबद्ध रीतीने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार तुमचा आहे.  
आजचा दिवस वेगळा आहे ! त्याला आपल्या कर्तुत्वाने अविस्मरणीय बनवूया! 

शुभ दिवस!

Friday, March 1, 2013

प्रवास : एक सुखद अनुभव

प्रवास हि एक आनंद देणारी गोष्ट आहे. मग तो प्रवास 
मामाच्या गावाला जायचा असुदे किंवा पर्यटन स्थळी , देव दर्शनासाठी किंवा अन्य कोणत्याही चांगल्या कारणासाठी!काही व्यक्तींना असा प्रवास (कामा निमित्त)एकाच मार्गाने बर्याच वेळा हि करावा लागत असतो परंतु प्रत्येक वेळच्या प्रवासात नजरेला पडलेल्या गोष्टी , अनुभव फारच वेगळे असतात. प्रत्येक वेळी नव्याने त्याच मार्गाची ओळख होत असते. जीवनाच्या प्रवासाचेही असेच आहे. शेवटी इथे जन्माला आलेल्या प्रत्येकाला एका अंतिम सत्याला (मृत्यू) सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात ठेवले तर त्या प्रवासाचा कंटाळा येणार नाही. रोज नवीन अनुभव, आव्हाने आणि घडामोडी यांना आपण सहजतेने स्वीकारू. आणि आपला प्रवास आपल्या सह प्रवाश्यांबरोबर  कसा अधिकाधिक आनंददायी घडेल याचा विचार आणि कृती आपण सहज करू शकू.