Showing posts with label माणूस. Show all posts
Showing posts with label माणूस. Show all posts

Monday, September 30, 2013

The Lunchbox



द लंच बॉक्स सिनेमा कालच पहिला. अतिशय दर्जेदार , कुठेही कंटाळा येऊ न देणारा  म्हटल
तर अति सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेला चित्रपट! 
ज्याचं आयुष्य मिळेल त्यात समाधानी राहणे आणि रोज जे बाराच्या ठोक्याला समोर 
येईल ते निमूट पणे  स्वीकारणे  असे असते त्यांच्या जीवनाची कहाणी . 
नवीन जीवन पद्धती ,महागाई या मुळे घरातील दुरावाणारी नाती , ठराविक चौकटी बाहेर 
विचार करायला लावणारी मनस्थिती आणि त्यातून आयुष्यात घडणारे बदल . 

सिनेमा पाहताना खरच एक विचार नक्की पक्का झाला कि घरातील माणसांमधील एकजूट , प्रेम, 
एकमेकांविषयीची मनापासून असलेली तळमळ , आपल्या जवळच्या माणसाला मिळालेल्या 
यशाने होणारा आनंद, छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीतून जवळच्या माणसांकडून मिळणारी 
कौतुकाची पोचपावती यांची उणीव निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींपासून प्रत्येक जण मग 
तो गरीब असो किंवा  श्रीमंत वंचित झाला आहे . किंबहुना ज्यांना या गोष्टी मिळतात त्यांचा त्या 
वरचा विश्वासही कमी झाला आहे. कुणी फक्त आपल्या स्वार्था करिता किंवा माझ्या कडून काही 
मिळावे या करिता माझ्या भावनांचा वापर तर करीत नाही न अशी भीती क्षणोक्षणी प्रत्येकाच्या 
मनात घर करून राहिली आहे . 

या करिता एकच उपाय आहे , घरातील माणसांशी सतत सवांद साधण्याचा प्रयत्न करा . त्यांची लहान 
मोठी दुखः , त्यांचे विचार , त्यांची मनस्थिती यावर लक्ष ठेवा आणि सकारात्मक विचार मांडण्याचा 
प्रयत्न करा . एकमेकाची काळजी घ्या .कठीण परिस्थितीत एकमेकाला दोष न देता शक्य असेल तो सामोपचाराचा मार्ग स्वीकारून , जवळच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या आणि मदतही घ्या .  आपली माणसे आपल्या महात्वाकांशा पायी दुरावली जाणार नाहीत याची काळजी घ्या . या जगात बराच काही मिळवण्या सारखं आणि शिकण्यासारख नक्कीच आहे पण सगळ काही मिळाल्यानंतर , आपल्या बरोबर 
कुणीच नाही याची जाणीव एका क्षणांत मिळवलेल्या सर्व गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेईल. 
दुखः आणि सुख दोन्हीही गोष्टी वाटून घेण्यासाठी माणसांची गरज असते आणि अशी माणसे आपल्या 
आसपासच असतात फक्त त्या संबंधातील ओलावा टिकवून ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे आपल्यावर 
अवलंबून असते . पहा पटत का .............

Friday, March 1, 2013

प्रवास : एक सुखद अनुभव

प्रवास हि एक आनंद देणारी गोष्ट आहे. मग तो प्रवास 
मामाच्या गावाला जायचा असुदे किंवा पर्यटन स्थळी , देव दर्शनासाठी किंवा अन्य कोणत्याही चांगल्या कारणासाठी!काही व्यक्तींना असा प्रवास (कामा निमित्त)एकाच मार्गाने बर्याच वेळा हि करावा लागत असतो परंतु प्रत्येक वेळच्या प्रवासात नजरेला पडलेल्या गोष्टी , अनुभव फारच वेगळे असतात. प्रत्येक वेळी नव्याने त्याच मार्गाची ओळख होत असते. जीवनाच्या प्रवासाचेही असेच आहे. शेवटी इथे जन्माला आलेल्या प्रत्येकाला एका अंतिम सत्याला (मृत्यू) सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात ठेवले तर त्या प्रवासाचा कंटाळा येणार नाही. रोज नवीन अनुभव, आव्हाने आणि घडामोडी यांना आपण सहजतेने स्वीकारू. आणि आपला प्रवास आपल्या सह प्रवाश्यांबरोबर  कसा अधिकाधिक आनंददायी घडेल याचा विचार आणि कृती आपण सहज करू शकू. 

अंतिम सत्य!

पैसा हे जीवनातील अंतिम सत्य नाही हे ज्या दिवशी तुमच्या  मनाला पटेल त्या दिवशी पासून तुमची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारेल असे समजावे.  जीवनाचे रहाट  गाडगे ओढता ओढता माणसातील माणूसपण कधी हरवतं ते त्याच त्यालाही काळात नाही. परंतु ते ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खर्या अर्थाने जन्माचे सार्थक झाले असे समजावे. ज्या आनंदाच्या शोधात  पूर्ण जन्म वाया घालवला तो खर तर माझ्यापाशीच आहे हे सत्य ज्या दिवशी उमगेल त्यादिवशी आपण पूर्ण समाधानी आहोत याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही.

Sunday, February 24, 2013

नातं

आजकाल प्रत्येकाला दिवस उजाडल्या पासून डोळे 
मिटे पर्यंत लहान मोठ्या अशा अनेक समस्यांना तोंड 
द्यावे लागते. काही गोष्टींची कल्पना असते तर काही 
अचानक समोर येत असतात. अशा वेळी घरातल्यांनी /जवळच्यानी आपल्या नात्यातील नाट्कीयता बाजूला ठेवून केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून वागण्याची गरज असते.  आणि बरेच वेळा असे न झाल्यामुळे रुसवे / फुगवे ,मान /अपमान  यांच्यात मनुष्य गुरफटत जातो. परिणामी आपापसातील दुरावा वाढत जातो. नात कोणतही
असलं तरी समोरची व्यक्ती हि आपल्या प्रमाणेच एक माणूस आहे आणि ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे तिच्या भावनाना जाणून वागण आपलं कर्तव्य आहे हा भाव लहानान पासून मोठ्यांपर्यंत रुजण्याची गरज आहे.