Monday, September 30, 2013

The Lunchbox



द लंच बॉक्स सिनेमा कालच पहिला. अतिशय दर्जेदार , कुठेही कंटाळा येऊ न देणारा  म्हटल
तर अति सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेला चित्रपट! 
ज्याचं आयुष्य मिळेल त्यात समाधानी राहणे आणि रोज जे बाराच्या ठोक्याला समोर 
येईल ते निमूट पणे  स्वीकारणे  असे असते त्यांच्या जीवनाची कहाणी . 
नवीन जीवन पद्धती ,महागाई या मुळे घरातील दुरावाणारी नाती , ठराविक चौकटी बाहेर 
विचार करायला लावणारी मनस्थिती आणि त्यातून आयुष्यात घडणारे बदल . 

सिनेमा पाहताना खरच एक विचार नक्की पक्का झाला कि घरातील माणसांमधील एकजूट , प्रेम, 
एकमेकांविषयीची मनापासून असलेली तळमळ , आपल्या जवळच्या माणसाला मिळालेल्या 
यशाने होणारा आनंद, छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीतून जवळच्या माणसांकडून मिळणारी 
कौतुकाची पोचपावती यांची उणीव निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींपासून प्रत्येक जण मग 
तो गरीब असो किंवा  श्रीमंत वंचित झाला आहे . किंबहुना ज्यांना या गोष्टी मिळतात त्यांचा त्या 
वरचा विश्वासही कमी झाला आहे. कुणी फक्त आपल्या स्वार्था करिता किंवा माझ्या कडून काही 
मिळावे या करिता माझ्या भावनांचा वापर तर करीत नाही न अशी भीती क्षणोक्षणी प्रत्येकाच्या 
मनात घर करून राहिली आहे . 

या करिता एकच उपाय आहे , घरातील माणसांशी सतत सवांद साधण्याचा प्रयत्न करा . त्यांची लहान 
मोठी दुखः , त्यांचे विचार , त्यांची मनस्थिती यावर लक्ष ठेवा आणि सकारात्मक विचार मांडण्याचा 
प्रयत्न करा . एकमेकाची काळजी घ्या .कठीण परिस्थितीत एकमेकाला दोष न देता शक्य असेल तो सामोपचाराचा मार्ग स्वीकारून , जवळच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या आणि मदतही घ्या .  आपली माणसे आपल्या महात्वाकांशा पायी दुरावली जाणार नाहीत याची काळजी घ्या . या जगात बराच काही मिळवण्या सारखं आणि शिकण्यासारख नक्कीच आहे पण सगळ काही मिळाल्यानंतर , आपल्या बरोबर 
कुणीच नाही याची जाणीव एका क्षणांत मिळवलेल्या सर्व गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेईल. 
दुखः आणि सुख दोन्हीही गोष्टी वाटून घेण्यासाठी माणसांची गरज असते आणि अशी माणसे आपल्या 
आसपासच असतात फक्त त्या संबंधातील ओलावा टिकवून ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे आपल्यावर 
अवलंबून असते . पहा पटत का .............

1 comment:

  1. हे सर्व कळते पण जेंव्हा कळते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते . कालाय तस्मै नमः । notorious fast life , race to grab money , money , money !

    ReplyDelete