Saturday, September 14, 2013

अनंत चतुर्दशी

Anant Chaturdashi Visarjan

गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस! बाप्पांना पुढच्यावर्षी लवकर या असं सांगून साश्रू नयनांनी निरोप 
देण्याचा दिवस !  बाप्पाच्या आगमनाचा आनंद हा स्त्रियांच्या माघार पणाला जाण्याच्या आनंद पेक्षाहि 
कितीतरी पट जास्त असतो  आणि विसर्जनाच्या  दिवशी होणारी आपल्या मनाची अवस्था सासरी निघालेल्या मुलीच्या आई सारखीच असते .  उत्सवाचे सगळे दिवस सर्व जण  एकाच भावनेने प्रेरित झालेले असतात. खरच असे उत्सव एक नवी शक्ती आणि नवी उर्जा निर्माण करतात . बऱ्याच  वेळा असे उत्सवच आपापसातले मतभेत / कटुता नष्ट होण्याचे एक निम्मित ठरतात . सर्व समावेशक असा हा उत्सव आपल्याला एक नवीन शिकवण , नवी स्फूर्ती , नव्या जाणीवा  देऊन जातो . या उत्सवाच खर वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती 
ठराविक पद्धतीचीच असली किंवा सजावट दरवर्षी प्रमाणेच असली तरी त्याच्या दर्शनाची आस 
तसूभरही कमी होत नाही  चतुर्थी पासून चतुर्दशी पर्यंत चे वातावरण बाप्पामय झालेले असते . 
आबालवृद्ध त्या विघ्नहर्त्याच्या सेवेत रंगून गेलेले असतात . आपले पद , प्रतिष्ठा सगळ काही त्याच्या 
पायाशी समर्पित करून त्याचे आशीर्वाद घेण्या करिता सर्व लहान थोर नतमस्तक होतात . 
असा आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या सर्वांचा निरोप घेईल 
आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याच आमंत्रण स्वीकारून आपल्या गावी निघून जाईल . 
त्याला निरोप देताना मी इतकच  मागण मागेन कि सर्वाना उत्तम बुद्धी दे , समाजातील विकृत 
मनोवृत्तींचा नायनाट कर आणि सर्वजण सुखी, समाधानी आणि आनंदी राहतील याची काळजी घेणारी 
सत्ता या भारत देशावर राज्य करू दे !

No comments:

Post a Comment