Smart Charger |
प्रवास हा माझा आवडता छंद आहे आणि तुमचाही असेलच यात शंका नाही . प्रवास
मग तो काही तासांचा असुदे किंवा काही दिवसांचा / जवळचा असुदे किंवा लांबचा पण
अशा प्रवासात काही ठराविक वस्तू आपल्याला नेहमीच जवळ ठेवाव्या लागतात
त्यातलाच एक म्हणजे आपला मोबाईल आणि त्याचा चार्जर . मोबाईल हि आज
काल तहान भुके इतकीच गरजेची वस्तू आहे परंतु ती वस्तू फक्त जवळ असून भागत
नाही तर अशा मोबाईलची Battery कायम पूर्ण चार्ज असणे गरजेचे असते . चार्जर जवळ
असला तरी मोबाईल आपण एक तर आपल्या कार मध्ये चार्ज करू शकतो किंवा
हॉटेल मधल्या रूम मधे . पण विचार करा प्रवास करताना आपण कोणत्याही कारणाने
अशा ठिकाणी अडकलो जिथे स्वताचे वाहन नाही आणि लवकर पोचणे शक्य नाही आणि
तशातच मोबाईल पूर्णपणे डिसचार्ज झाला .
याच विचारातून या मोबाईल चार्जर चा जन्म झाला असावा असं वाटल . मी हा चार्जर
जेव्हा पहिल्यांदा पहिला तेव्हा माझा विश्वासच बसेना पण आता तो वापरायला लागल्या
पासून त्याचे अनेक फायदे माझ्या लक्षात आले आहेत
* हा चार्जर मी माझ्या पर्स मध्ये कॅरी करू शकते . आणि पर्स मधेच मोबाईल चार्जिंग ला लावू शकते
* मोबाईल चार्ज होताना जर कॉल आलाच तर चार्जर सहज वेगळा करून बोलू शकते व परत
लगेच चार्जिंग ला लावू शकते
* हा चार्जर आणि चार्जिंग ला लावलेला फोन दोन्ही सहज हातात घेऊन मी कुठेही फिरू शकते
* कोणत्याहि प्रवासात मला कोणत्याही परीस्थितीत या मुळे फोन चार्जिंग ची काळजी वाटेनाशी झाली आहे
No comments:
Post a Comment