Showing posts with label मन. Show all posts
Showing posts with label मन. Show all posts

Saturday, March 16, 2013

माझी लाडकी अभिनेत्री : दीप्ती नवल

Dipti Naval

लहान पणापासून जिचे चित्रपट पाहत आले आणि नकळत जिने मनात घर केले,  जिच्या चेहऱ्यावर आजही ते नाजूक हास्य तसच आहे. जीच्या कडे पाहून अतिशय आदर वाटतो. आज पंचावन्न  वर्षे वय  असतानाही तिची तब्बेत तिने उत्तम ठेवली आहे. खर तर ती जशी आधी दिसायची तशीच, किंबहुना त्याहून सुंदर ती आजही दिसते अशी माझी लाडकी अभिनेत्री दीप्ती नवल हिला पाहण्याचा योग वारंवार येत असतो पण आज तिचा फोटो काढण्याचा योग आला.  रविवारी  आम्हा उभयतांना, तिचे  मॉर्निग वॉक च्या निमित्ताने नेहमीच दर्शन घडत असते.  तिच्याकडे पाहिल्यावर नक्कीच एक प्रेरणा मिळते. आज या वयातही नित्यनेमाने सकाळी फिरायला जाण्याचा सराव तिने कायम ठेवला आहे. तिच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली कि तिची तिच्या कामावरील निष्टा आजही कायम आहे. आणि त्यात ती शक्यतो खंड पडू देत नाही.तिचे छंद तिने आजही जोपासलेले आहेत. तिची फोटोग्राफी , पुस्तके प्रसिद्ध आहेत. अनेक माणसे विविध कारणांनी आपल्या मनाचा ठाव घेत असतात परंतु काही वेळा त्यांच्या संपर्कात गेल्या वर सत्य काहीतरी वेगळेच आहे असे जाणवते. परंतु असा अनुभव दीप्ती नवलला भेटल्यावर आला नाही.  माझ्या या लाडक्या अभिनेत्रीला  ईश्वर  दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो!  

Monday, March 11, 2013

मोर्निंग वॉक

Morning Walk 
गेले काही महिने दर थोड्या दिवसांनी मी एक संकल्प करत असते. काहीच दिवसात तो मोडतो आणि मग नव्या उमेदीने स्वतःला आठवण करून द्यायची वेळ येते. तो संकल्प म्हणजे रोज सुप्रभाती फिरायला जाणे. एक सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून नियमित चालायला जावे हि इच्छा मनात बाळगून 
रोज सकाळी लवकर उठण्याचा सराव ठेवला आहे   परंतु काही वेळा कामाच्या,झोपेच्या किंवा ऋतूच्या बदलत्या स्वरूपा मुळे ते घडत नाही असे लक्षात 
आले. मग एक कल्पना सुचली. ज्यावेळी फिरायला जाऊ त्यावेळी दिनदर्शिकेवर त्या तारखेला फुली मारणे सुरु केले. महिन्याच्या शेवटी फुल्यांची संख्या बघून स्वतः चीच लाज वाटली. एक स्त्री म्हणून घरातील इतर कामे, कार्यालयातील जबाबदाऱ्या सहज स्वीकारताना, मी  व्यायामा बद्दल इतकी निष्काळजी कशी राहू शकते याचे माझे मलाच आश्चर्य वाटले.  कारण काहीही असो, असेच जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर तुमचा अभिप्राय नक्की द्या. या संदर्भात तुम्ही कोणते उपाय अवलंबले ते हि नक्की कळवा.

Monday, March 4, 2013

गजरा

पूर्वी मंगल कार्य आणि मोगऱ्याचा गजरा 
(किंवा जाई ,जुई ,चमेली चा गजरा )  हे समीकरण जणू रूढच होत. आज काल केस कापलेले असल्यामुळे काही वेळा मनात असूनही फुल किंवा गजरे घालता येत नाहीत. ते काहीही असल तरी सुगंधी फुलांच्या वासाने मन प्रसन्न होत.  पवित्र भावना जागृत होतात किंबहुना मंगल समयी
जमलेल्या सर्व मंडळींनी आनंदी वातावरणात ते मंगल कार्य साजरं करण्याचा उद्देश बर्याच अंशी सफल होतो. अशा सुगंधाने काही काळ का होईना स्त्रिया आपल दुक्ख, मनातील ताण  पूर्ण पणे विसरून त्या आनंदाच्या सोहळ्यात रममाण होताना दिसतात. प्रेम व्यक्त करण्या साठी आपल्या जवळच्या माणसांनी दिलेला असा सुगंधी फुलांचा आहेरही स्त्रियांना एक अनामिक आनंद देऊन जातो.

Saturday, March 2, 2013

मन आणि भावना

मन आणि भावना यांचं एक अतूट नात आहे.  क्षणोक्षणी अनेक भावना , विचार मनात निर्माण होत असतात परंतु अशा भावनांची अभिव्यक्ती हि व्यक्ती सापेक्ष असते.  काही माणसं  प्रत्येक भावना सहजतेने आणि योग्य रीतीने व्यक्त करू शकतात तर काहींच्या बाबतीत त्या अव्यक्त राहतात किंवा ठराविकच भावना ते सहजतेने व्यक्त करू शकतात.
याची कारणे  प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत भिन्न असतात परंतु त्या, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीत व्यक्त न झाल्यास मनुष्याचे भावविश्व कोलमडून जाते. पर्यायाने त्याचा त्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतो. मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्याइतकेच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाचे आहे.  या करता प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचा शोध घेणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडतो आहोत हे शोधून, त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  तरच  सर्वांग सुंदर भावनाविष्काराचा आपण अनुभव घेऊ शकू, ज्यायोगे जीवनातील प्रत्येक क्षण खर्या अर्थाने जगल्याचे समाधान मिळेल. 

Monday, February 25, 2013

आयुष्य

आयुष्यातील चढ उतार कुणालाही चुकले नाहीत.  संकटं आली कि हातात हात घालून येतात. आर्थिक, मानसिक ,शारीरिक एकदम एकत्र  जमतात . एकातून बाहेर पडाव तर दुसरं हजर असत . परंतु परिस्थिती बदलली कि हेच सगळ सोपं  वाटत . सगळ्या संकटांना सहज पळवता येत आणि" अरे हे आपण आधी का नाही केल ?"असं स्वतः लाच विचारावस वाटत. संकटं गेली तरी मनावरचे घाव भरत नाहीत. असं असलं तरी आयुष्य काही थांबत नाही. म्हणून सतत आनंदी राहावं, आयुष्याला हसत मुखाने सामोर जाव . संकटकाळी इतरांना मदत 
करावी , कधीतरी याच नावेत आपणही प्रवास करत होतो याची जाण सतत असू द्यावी.

Sunday, February 24, 2013

नातं

आजकाल प्रत्येकाला दिवस उजाडल्या पासून डोळे 
मिटे पर्यंत लहान मोठ्या अशा अनेक समस्यांना तोंड 
द्यावे लागते. काही गोष्टींची कल्पना असते तर काही 
अचानक समोर येत असतात. अशा वेळी घरातल्यांनी /जवळच्यानी आपल्या नात्यातील नाट्कीयता बाजूला ठेवून केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून वागण्याची गरज असते.  आणि बरेच वेळा असे न झाल्यामुळे रुसवे / फुगवे ,मान /अपमान  यांच्यात मनुष्य गुरफटत जातो. परिणामी आपापसातील दुरावा वाढत जातो. नात कोणतही
असलं तरी समोरची व्यक्ती हि आपल्या प्रमाणेच एक माणूस आहे आणि ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे तिच्या भावनाना जाणून वागण आपलं कर्तव्य आहे हा भाव लहानान पासून मोठ्यांपर्यंत रुजण्याची गरज आहे.