Showing posts with label समाधान. Show all posts
Showing posts with label समाधान. Show all posts

Wednesday, March 13, 2013

संधी

Nature
बरेच वेळा समोर येणाऱ्या संधी या अनपेक्षित व्यक्तीन कडून, अनपेक्षित क्षेत्रा संबंधी,अनेपेक्षित ठिकाणीच येत असतात आणि  ती एक उत्तम संधी होती हे कळायला फार उशीर होतो. तो पर्यंत हातून ती निसटून गेलेली असते.  काही वेळा आपण 
" कारणे द्या आणि काही करू नका" अशा विचारसरणी मुळेही अशा संधींना मुकत असतो. कुणीही काहीही नवीन सुचवले तर त्या गोष्टीला प्रथमतः विचार न करताच 
नकार देणे. किंवा सुचवलेली गोष्ट मी करूच शकणार नाही हे गृहीतक मनात धरून नकार देणे. किंवा केवळ हे मी कधी या आधी करूनच पहिले नाही म्हणून आताही करणारच नाही असा नकारात्मक दृष्टीकोन ठेवणे हि संधी हुकण्याची ढोबळ कारणे असू शकतात. कारणे काहीही असली तरी ज्या एका गोष्टीमुळे आपले आयुष्य बर्याच अंगानी समृद्ध होऊ 
शकतं  अशी एक संधी जरी वाया गेली आणि तीच गोष्ट  सहजपणे स्वीकारलेल्या व्यक्तींना प्रगती करताना पहिले कि नकळतच पश्चाततापाची भावना निर्माण होते. या साठी जीवनाकडे सकारत्मक दृष्टीकोन ठेवून पाहता येणे गरजेचे आहे.  आपल्या व्यवहारातील एकनिष्ठता आणि कष्ट यांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा 
आपण येणाऱ्या संधीला एक आव्हान म्हणून सहज स्वीकारू आणि सफल होण्याच्या दृष्टीकोनातून सतत प्रयत्शील राहू . जीवनातील संधीला ओळखणे आणि त्यावर परिश्रम घेऊन स्वतःची प्रगती साधणे हे समाधानी आयुष्याच एक गमक म्हणावं लागेल. 

Tuesday, March 12, 2013

निष्ठा


समाजसेवेची संधी प्रत्येकाला रोजच्या दिनक्रमात  , रोजच्या व्यवहारात सतत मिळत असते परंतु काहीवेळा ते आपले कर्तव्य किंवा एक सहज व्यवहार असल्यामुळे 
आपल्याला त्याची जाणीव होत नाही. सरकारी कार्यालयात काम करताना याचा अनुभव मला बरेच वेळा येत असतो. कार्यालयात चौकशी साठी आलेल्या  माणसाला 
समाधान कारक उत्तर मिळाले , योग्य वागणूक मिळाली कि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा असतो किंवा त्याचे काम झाले आहे हे कळल्यावर चेहऱ्यावर 
झळकणारी कृतज्ञता समाधान देऊन जाते. परतू अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकार्यान  बरोबर जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा फार वेगळे अनुभव येतात. अशाच एका भ्रष्ट अधिकार्याच्या वर्तणुकीचा इथे उल्लेख करावासा वाटतो. आयुष्यभर आपल्याला असलेल्या ज्ञानाचा, अधिकाराचा आणि अनुभवाचा वापर या व्यक्तीने भ्रष्टाचारासाठी केला. केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर हाताखालच्या कर्मचार्यांना हीन वागणूक देऊन, जमेल त्यांना हाताशी धरून आपले वाईट व्यवहार सुरूच ठेवले.  ज्यावेळी निवृत्तीची वेळ जवळ आली त्यावेळी फार मोठ्या मोठ्या समाज सेवेच्या गोष्टी हा माणूस करू लागला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळावी त्याप्रमाणे हा मनुष्य सी बी आय च्या धाडीत सापडला.  काही दिवस तुरुंगात राहिल्या नंतर त्याची सुटका झाली परंतु आयुष्य भर केलेल्या पापांचा धडा याच जन्मी वाचवा लागला. सरकारी कार्यालयांकडे बर्याच वेळा याच नजरेने पाहिलं जात ते अशा मुठभर भ्रष्टाचारी लोकांमुळे. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी सांगू शकते कि समाजसेवा खऱ्या अर्थाने करायची असेलच तर ती सरकारी कार्यालयात काम करून जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. आज प्रामाणिक आणि मेहेनती लोकांची अशा ठिकाणी फार मोठी गरज आहे. सर्व सामान्य नागरिकांसाठी जेव्हा काम करण्याची संधी मिळते तेव्हा , खऱ्या अर्थाने त्यांच्या दुख्हांची आपल्याला जाणीव होते. खरतर बाहेर पडून समाजासाठी काही करता येत नसेल तर, केवळ प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम निष्ठेने केल्यास तीच खर्या अर्थाने समाजसेवा ठरेल असे म्हणावे लागेल. 

Saturday, March 2, 2013

मन आणि भावना

मन आणि भावना यांचं एक अतूट नात आहे.  क्षणोक्षणी अनेक भावना , विचार मनात निर्माण होत असतात परंतु अशा भावनांची अभिव्यक्ती हि व्यक्ती सापेक्ष असते.  काही माणसं  प्रत्येक भावना सहजतेने आणि योग्य रीतीने व्यक्त करू शकतात तर काहींच्या बाबतीत त्या अव्यक्त राहतात किंवा ठराविकच भावना ते सहजतेने व्यक्त करू शकतात.
याची कारणे  प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत भिन्न असतात परंतु त्या, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीत व्यक्त न झाल्यास मनुष्याचे भावविश्व कोलमडून जाते. पर्यायाने त्याचा त्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतो. मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्याइतकेच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाचे आहे.  या करता प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचा शोध घेणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडतो आहोत हे शोधून, त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  तरच  सर्वांग सुंदर भावनाविष्काराचा आपण अनुभव घेऊ शकू, ज्यायोगे जीवनातील प्रत्येक क्षण खर्या अर्थाने जगल्याचे समाधान मिळेल.