समाजसेवेची
संधी प्रत्येकाला रोजच्या दिनक्रमात , रोजच्या व्यवहारात सतत मिळत असते परंतु काहीवेळा ते आपले कर्तव्य किंवा एक सहज
व्यवहार असल्यामुळे
आपल्याला त्याची जाणीव होत नाही. सरकारी कार्यालयात काम
करताना याचा अनुभव मला बरेच वेळा येत असतो. कार्यालयात चौकशी साठी आलेल्या माणसाला
समाधान कारक उत्तर मिळाले , योग्य
वागणूक मिळाली कि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा असतो किंवा त्याचे काम झाले आहे हे
कळल्यावर चेहऱ्यावर
झळकणारी कृतज्ञता समाधान देऊन जाते. परतू अशा ठिकाणी काही
भ्रष्ट अधिकार्यान बरोबर जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा फार वेगळे अनुभव
येतात. अशाच एका भ्रष्ट अधिकार्याच्या वर्तणुकीचा इथे उल्लेख करावासा वाटतो. आयुष्यभर
आपल्याला असलेल्या ज्ञानाचा, अधिकाराचा आणि अनुभवाचा वापर या
व्यक्तीने भ्रष्टाचारासाठी केला. केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर हाताखालच्या कर्मचार्यांना
हीन वागणूक देऊन, जमेल त्यांना हाताशी धरून आपले वाईट व्यवहार सुरूच ठेवले. ज्यावेळी
निवृत्तीची वेळ जवळ आली त्यावेळी फार मोठ्या मोठ्या समाज सेवेच्या गोष्टी हा माणूस
करू लागला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळावी
त्याप्रमाणे हा मनुष्य सी बी आय च्या धाडीत सापडला. काही दिवस तुरुंगात
राहिल्या नंतर त्याची सुटका झाली परंतु
आयुष्य भर केलेल्या पापांचा धडा याच जन्मी वाचवा लागला. सरकारी कार्यालयांकडे बर्याच वेळा याच नजरेने पाहिलं जात ते
अशा मुठभर भ्रष्टाचारी लोकांमुळे. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी सांगू शकते
कि समाजसेवा खऱ्या अर्थाने करायची असेलच तर ती सरकारी कार्यालयात काम करून
जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. आज प्रामाणिक आणि मेहेनती लोकांची अशा
ठिकाणी फार मोठी गरज आहे. सर्व सामान्य
नागरिकांसाठी जेव्हा काम करण्याची संधी मिळते तेव्हा , खऱ्या अर्थाने त्यांच्या दुख्हांची आपल्याला जाणीव होते. खरतर
बाहेर पडून समाजासाठी काही करता येत नसेल तर, केवळ प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम निष्ठेने केल्यास तीच खर्या अर्थाने समाजसेवा ठरेल असे म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment