आजची स्त्री चूल आणि मुल या पलीकडच आयुष्य अनुभवायला शिकली आहे. अस करताना बरेचवेळा तिची तारेवरची कसरत सुरु असते परंतु त्या सर्वाचा आनंद घेत ती आपले जीवन समृद्ध करत असते. पर्यायाने ती आपल्या कुटुंबातील एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणूनही काम करत असते. तिच्या शब्दाला आज घरात किंमत आहे कारण तिचा अनुभवही उपयुक्त आहे. चार भिंतीत दडलेल्या तिच्या जीवाला आज मोकळा श्वास मिळत आहे. परंतु या सर्वाचे चांगले तसेच वाईट परिणामही आज समाजात पहावयास मिळत आहेत. आज समाजात स्त्रीला मिळालेलं स्वातंत्र्य हा तिचा अधिकार नक्कीच आहे परंतु त्याही पेक्षा जास्त ती एक जबाबदारी आहे . त्या स्वातंत्र्याचा योग्य तो उपयोग आपल्या साठी, आपल्या कुटुंबासाठी करत असताना आपण काही चुकीच्या गोष्टींना खत पाणी घालत नाही ना
या साठी एक स्त्री म्हणून प्रत्येकीने जागरूक असणे आवश्यक आहे.तरच अशी जागरुकता आणि सतर्कता तिच्या कुटुंबा मधेही रुजेल आणि आज समाजात घडत असलेल्या बर्याच विघातक कृत्यांपासून ती स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला दूर ठेवू शकेल. आज कुटुंबासमोर स्त्रीने एक आदर्श माता , आदर्श पत्नी आणि आदर्श
नागरिक या तीनही भूमिका १००% योग्य रीतीने पार पाडण्याची गरज आहे आणि यात तिला कुटुंबाची हि तितकीच साथ मिळणे गरजेचे आहे. तरच आज समाज ज्या वाईट घटनांना, विघातक शक्तींना सतत तोंड देत आहे त्या बर्याच अंशी कमी होतील यात शंका नाही. जो आदर्श आजची स्त्री उद्याच्या स्त्रियान समोर ठेवणार आहे त्याचीच "री"ओढली जाणार आहे याची जाणीव प्रत्येक स्त्री ने ठेवणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment