Friday, March 8, 2013

पर्यटन

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर ला जाऊन आले. अतिशय नयनरम्य निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात चार दिवस भुर्र निघून गेले. एक नवीन उत्साह आणि आनंद या सह घरी परतले. या चार दिवसात घर , कार्यालय सगळं काही पूर्णपणे विसरून जायला झालं होत. परंतु घरी परत आल्यावर कामाचा उत्साह दुणावल्या सारखे वाटले. मनावरचा ताण कमी झाला होता. कार्यालयातही कामाचा हुरूप वाढला होता. आणि अशा प्रवासाची किंवा काही दिवस वेगळ्या वातावरणात, वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या दिनचर्येत दिवस घालवणे किती महत्वाचे आहे ते कळले. आज काल पर्यटन हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पूर्वी स्त्रियांसाठी माघारपण हि एकच गोष्ट त्यांना चार वेगळे दिवस दाखवत असे . आपल्या माहेरच्या माणसांना भेटून, मन मोकळं बोलून ती आपला ताण दूर करत आसे. फारच जास्त म्हणजे कुटुंबासह देव दर्शनाला जात असे. या पलीकडे स्त्री ला कोणतही जग नव्हत. परंतु आज काळ बदलला आहे.केवळ ती स्त्री नव्हे तर सर्व कुटुंबीय अशा छोट्या सहलींच सहज स्वागतकरतात आणि त्याचा आनंदही घेताना दिसतात. काळ बदलला, साधनं बदलली तरी जीवनाचा आनंद घेण आणि आनंदी रहाण  हा मनुष्याचा सहज स्वभाव आहे हे आपल्याला  लक्षात येत.  त्यामुळे जीवनात अनुभवला येणारं दुखः हि आपणच जीवनात निर्माण केलेली जटिलता किंवा गुंतागुंत तर नाही ना याचा मागोवा घेण गरजेचं आहे.

No comments:

Post a Comment