Sunday, March 3, 2013

जागतिक महिला दिन : संकल्प

आज  मरिअम  माकेबा हिचा जन्म दिवस
(४ मार्च १९३२ ते ९ नोव्हेंबर २००८).  साउथ आफ्रिके मधील जागतिक कीर्तीची हि गायिका एक जागरूक नागरिक होती. परंतु तिच्या वर्ण भेदाविरुद्धच्या लढ्यामुळे आफ्रिकन सरकारने तिचे नागरिकत्व नाकारले व पुन्हा देशात परतण्यास तिला बंदी केली.
हि माहिती वाचताना जवळ येउन ठेपलेल्या जागतिक महिला दिनाची आठवण झाली.  स्त्री खर्या अर्थाने आजही न्याय मिळवू शकली आहे का?आजही तिला समान दर्जाने खर्या अर्थाने वागवले जाते आहे का?आजही ती आर्थिक, शैक्षणिक पातळीवर  सक्षम झाली आहे का? 
तर याचे उत्तर नाही असेच मिळेल. आजही शहरांमध्ये सुशिक्षित म्हणवणाऱ्या  कुटुंबामध्ये स्त्री भ्रूण हत्या, मुलीना दुय्यम दर्जाची वागणूक हे प्रकार सर्रास घडत आहेत. समाजात काही उत्तम उदाहरणे हि दिसतात परंतु आपले हक्क पूर्ण पणे मिळालेल्या अशा किती 
मुली आहेत ज्या स्वतःहून पुढे होऊन इतरांना त्यांचा अधिकार मिळवून देण्या साठी झटतात?  आता  बदल घडवून आणायचा असेल तर प्रत्येक स्त्रीने स्त्रीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मग ती स्त्री आई/मुलगी/सून/नात /भाची/पुतणी/मैत्रीण  किंवा जिच्याशी  मनाने नात जुळलेली अशी कुणीही स्त्री असेल.  या जागतिक 
महिलादिनी या साठी संकल्प करू आणि फार दूर नाही जाता आल तरी आपल्या संपर्कातील स्त्रियांपासून याची सुरवात करू. 

1 comment:

  1. आता बदल घडवून आणायचा असेल तर प्रत्येक स्त्रीने स्त्रीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मग ती स्त्री आई/मुलगी/सून/नात /भाची/पुतणी/मैत्रीण किंवा जिच्याशी मनाने नात जुळलेली अशी कुणीही स्त्री असेल. या जागतिक
    महिलादिनी या साठी संकल्प करू आणि फार दूर नाही जाता आल तरी आपल्या संपर्कातील स्त्रियांपासून याची सुरवात करू.

    ReplyDelete