Europe |
आजच वृत्तपत्रात आगाऊ पैसे घेऊन लोकांना फसवल्याची बातमी एका पर्यटन कंपनी संदर्भात
वाचनात आली. फसवणुकीच्या धक्क्याने असे पैसे
गुंतावाणाऱ्या एका व्यक्तीचे निधन झाले. बरीच माणसे सहकुटुंब परदेशी वारीची मजा घेण्याकरता दर
महिन्याला ठराविक रक्कम अशा कंपन्यात गुंतवत असतात.. असे करताना हि कंपनी दिवाळखोरीत गेली तर काय हा विचार मनातही येत नाही.
परंतु असे पैसे दर महिना अशा कंपनीत गुंतावाण्या पेक्षा आवर्ती ठेव
योजनेत गुंतवून आपल्याला प्रवासाला जायचे असेल त्यावेळी वापरता येतात.
किंबहुना
या दरम्यान काही आर्थिक आपत्ती आल्यास ते पैसे इतरही ठिकाणी
वापरण्याची संधी हातात ठेवता येते
उजाडणारा प्रत्येक दिवस हा रोज
नवीन आनंद , नवीन उत्साह घेऊन येत असतो.तसेच नवीन समस्या, नवीन प्रश्न, नवीन आव्हानही घेऊन येतो. या दोहोंचा सुवर्णमध्य साधूनच प्रत्येक पाऊल उचलले गेले तर आपण भविष्य
काळात निर्माण होणार्या बर्याच संकटाना टाळू शकतो. आता सुट्ट्यांचा
सिझन सुरु होईल.प्रत्येक जण कुटूंबासह चार दिवस पर्यटन स्थळी जाण्याच्या विचारात असेल. परंतु घरातील वृद्ध
व्यक्ती, वाढलेल्या महागाई मुळे होणारा वाढीव प्रवासाचा
खर्च ,मुलांच्या शिक्षणा साठी भविष्यात लागणारा पैसा इत्यादी , या
सर्वांचा उत्तम ताळमेळ घालूनच प्रत्येक जण आपल्याला झेपेल
अशा ठिकाणी चार दिवस जाण्याचे ठरवेल. तसे न
केल्यास , कुणाच्या भरीस पडून किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट आयुष्यात करत राहिलात ,
तर भविष्यात तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल हे नक्की. त्यामुळे आपल्यासाठी कोणत्या पद्धतीचे आर्थिक
नियोजन योग्य आहे आणि त्या साठी कोणत्या गोष्टीना
जीवनात प्राथमिकता दिली पाहिजे याचे ज्ञान असणे गरजेचे
आहे.
No comments:
Post a Comment