Monday, March 4, 2013

गजानन महाराज : प्रगट दिन

भक्तीचा सागर उचंबळे मनात, 
गुरु माझा प्रगट  झाला आज!
त्याचे गुण वर्णाया तोकडी माझी मती ,
तरी रक्षी संकटी, या मूढा !
थोर तुझी माया, शरण आले पाया ,
झीजाविली काया तुझ्या नामे !
तूच माझा सखा, तूच पाठीराखा
तूच झालास त्राता , संकटसमयी!
तुझे अनंत उपकार, माझे पाप अपार ,
तुज चरणांचा आधार, तारी  मज आता !
क्षमा म्हणे देवा , भक्तीचा हा ठेवा,
निरंतर रहावा मना माजी!
अंतिम समयी तुझेच स्मरण , 
तुझ्यात विलीन अंतर्बाह्य!

2 comments: