Happy Maha Shivaratri! |
आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा दिवस!
आजच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे, पूजा करणे,अभिषेक करणे ,लघु रुद्र , महा रुद्र अशा अनेक गोष्टी आपण लहानपणा पासून
आपल्या आई वडिलांना करताना पाहत आलो आहे. शंकराच्या मंदिरात आज कित्येक लिटर दुधाचा अभिषेक केला जाईल. परंतु असे अभिषेक केलेले दुध कुणाच्याही पोटात न जाता कदाचित वायाही
जाण्याची शक्यता आहे. ईश्वरा प्रती आपली भावना व्यक्त करण्यात काहीच चूक नाही परंतु अशी भावना व्यक्त करताना आपण आपल्या आसपासच्या किती गोष्टींचा योग्य विचार करून आपली कृती करत असतो?
मला असे वाटते कि आजच्या दिवशी जे दुध आपण पिंडीवर अभिषेका साठी वापरू तेच जर एखाद्या गरीबाच्या पोटात गेले तर त्या जीवाला त्याचा नक्की फायक होईल. ईश्वराच नामस्मरण, ह्या कलियुगात मोक्ष प्राप्तीचा एक सोपा आणि सहज मार्ग आहे असं अनेक संत सांगून गेले आहेत. मग हातून असे पुण्याचे काम करून, शंकराचे केवळ नामस्मरण केल्यास तो आपल्याला का प्रसन्न होणार नाही? तुम्हाला काय वाटते?
No comments:
Post a Comment