Festivals |
उत्सवांचा आनंद छोट्या/मोठ्या सर्व कार्यक्रमांतून आपण लुटत असतो.
घरातील सण/समारंभ/धार्मिक कार्यक्रम हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते ठराविक पद्धतीने साजरे होतात. परंतु जेव्हा सामाजिक कार्यक्रमात किंवा कार्यालयीन कार्यक्रमात आपण सहभागी होतो त्यावेळी अशा कार्यक्रमांचा अनुभव प्रत्येक वेळी वेगळाच असतो. प्रत्येक वेळी विविधता असते, सहभागी होणारी माणसे वेगळी असतात, सतत नाविन्य राखण्यासाठी नवनवीन कल्पना राबवल्या जातात. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी अशा कार्यक्रमांतून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. आपल्या आसपास असणाऱ्या आणि आपण ज्यांना उत्तम ओळखतो अशा माणसांच्यातील सुप्त गुणांची ओळख आपल्याला खर्या अर्थाने अशा कार्यक्रमातून होत असते. काही वेळा असे कार्यक्रम आपल्यालाही आपल्यातील काही गुणांची नव्याने ओळख करून देतात आणि एक अनाहूत आनंद देऊन जातात.अशा गोष्टी करत असताना मिळणारे प्रोत्साहन, शाबासकीची थापही मनुष्याचे आयुष्य बदलू शकते, त्याचा आत्मविश्वास नव्याने वाढवत असते. तुम्हीही एखाद्या सामाजिक कार्यात योगदान देत असाल किंवा कार्यालयीन कामा व्यतिरिक्त कार्यालयात होणार्या इतर कार्यक्रमात तुमचा सहभाग असेल तर तुम्हाला नक्कीच असे अनुभव वारंवार येत असतील. तुमचे अनुभव प्रतिक्रियेच्या स्वरुपात नक्की सांगा!
No comments:
Post a Comment