Showing posts with label संधी. Show all posts
Showing posts with label संधी. Show all posts

Wednesday, May 8, 2013

विश्वासाने जगा !

Anand
जगातील खरा चांगुलपणा तुमच्यातच सामावलेला आहे. त्या चांगुलपणावर विश्वास ठेवा . 
जीवनाचा खरा आनंद तुमच्यातच सामावलेला आहे त्या आनंदावर विश्वास ठेवा. जीवन उत्तम जगण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. तुमचा चांगुलपणा , आनंदी स्वभाव आणि उत्तम हेतू यातून तुम्ही जीवनात नाविन्यपूर्ण  सकारात्मक बदल घडवू शकता हे जग स्वर्गाहून सुंदर करण्याची जबाबदारी आपली आहे.  तुमच्या कृतीतून /व्यवहारातून तुमच्यातील चांगुलपणा प्रतीत होणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःच एक आदर्श ठरण्याचा प्रयत्न करा तुमचे जीवनावरील प्रेम तुमच्या उत्तम हेतू मध्ये, कृतीमध्ये , नवनिर्मिती मध्ये , व्यवहारामध्ये जाणवेल असे जीवन जगा . जीवन सुंदर आहे आणि जीवनात असामान्य संधी  उपलब्ध आहेत. जीवनाचा प्रत्येक क्षण त्या संधींच सोन करण्यासाठी व्यतीत करा  . तुम्हाला प्राप्त झालेल्या जीवनावर जीवापाड प्रेम करा आणि त्याला अधिक सुंदर करण्याचा आटोकाट प्रयत्न करा 

हे जीवन सुंदर आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Sunday, May 5, 2013

आनंदी राहा!

आनंदी राहा!  जिथे असाल जसे असाल तसे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा . किंबहुना आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करा . कोणतीही गोष्ट तुम्हाला सहज आनंद देणार 
नाही पण आनंद मिळवण्याची संधी मात्र नक्कीच देईल . 
जर आनंदाचे काही कारणच  नसेल तर आनंदी कसे राहणार? त्यासाठी आनंदालाच तुमचे कारण बनवा आणि त्याचा अनुभव घ्या !सकारात्मक विचार आणि खरा आनंद हेच मनाला बळकटी देतात . आनंदासाठी लाचार होऊन कारण शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक क्षण हीच आनंदी जीवनाची संधी आहे हे जाणणे , आवश्यक आहे. आनंद हि तुमची प्रतिक्रिया नसून तिला तुमची वृत्ती बनवा . प्रत्येक कृती मागे आनंद घेण्याचा हेतू ठेवा तरच ते तुमच्या जीवनातील एक सत्य असेल. हि गोष्ट खरच साधी, सोपी आणि कुणालाही जमण्या सारखी आहे. असं झाल्यास खरा  आणि निखळ आनंद दूर नहि. अनुभवून पहा!

Tuesday, March 19, 2013

उत्सव प्रेमी भारतीय!

Festivals
आपण भारतीय उत्सव प्रेमी माणसे आहोत यात शंका नाही. आणि अशा 
उत्सवांचा आनंद छोट्या/मोठ्या सर्व कार्यक्रमांतून आपण लुटत असतो. 
घरातील सण/समारंभ/धार्मिक कार्यक्रम हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते ठराविक पद्धतीने साजरे होतात. परंतु जेव्हा सामाजिक कार्यक्रमात किंवा कार्यालयीन कार्यक्रमात आपण सहभागी होतो त्यावेळी अशा कार्यक्रमांचा अनुभव प्रत्येक वेळी वेगळाच असतो.  प्रत्येक वेळी विविधता असते, सहभागी होणारी माणसे वेगळी असतात, सतत नाविन्य राखण्यासाठी नवनवीन कल्पना राबवल्या जातात. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी अशा कार्यक्रमांतून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. आपल्या आसपास असणाऱ्या आणि आपण ज्यांना उत्तम ओळखतो अशा माणसांच्यातील सुप्त गुणांची ओळख आपल्याला खर्या अर्थाने अशा कार्यक्रमातून होत असते. काही वेळा असे कार्यक्रम आपल्यालाही आपल्यातील काही गुणांची नव्याने ओळख करून देतात आणि एक अनाहूत आनंद देऊन जातात.अशा गोष्टी करत असताना मिळणारे प्रोत्साहन, शाबासकीची थापही मनुष्याचे आयुष्य बदलू शकते, त्याचा आत्मविश्वास नव्याने वाढवत असते.  तुम्हीही एखाद्या सामाजिक कार्यात योगदान देत असाल किंवा कार्यालयीन कामा व्यतिरिक्त कार्यालयात होणार्या इतर कार्यक्रमात तुमचा सहभाग असेल तर तुम्हाला नक्कीच असे अनुभव वारंवार येत असतील. तुमचे अनुभव प्रतिक्रियेच्या स्वरुपात नक्की सांगा!

Wednesday, March 13, 2013

संधी

Nature
बरेच वेळा समोर येणाऱ्या संधी या अनपेक्षित व्यक्तीन कडून, अनपेक्षित क्षेत्रा संबंधी,अनेपेक्षित ठिकाणीच येत असतात आणि  ती एक उत्तम संधी होती हे कळायला फार उशीर होतो. तो पर्यंत हातून ती निसटून गेलेली असते.  काही वेळा आपण 
" कारणे द्या आणि काही करू नका" अशा विचारसरणी मुळेही अशा संधींना मुकत असतो. कुणीही काहीही नवीन सुचवले तर त्या गोष्टीला प्रथमतः विचार न करताच 
नकार देणे. किंवा सुचवलेली गोष्ट मी करूच शकणार नाही हे गृहीतक मनात धरून नकार देणे. किंवा केवळ हे मी कधी या आधी करूनच पहिले नाही म्हणून आताही करणारच नाही असा नकारात्मक दृष्टीकोन ठेवणे हि संधी हुकण्याची ढोबळ कारणे असू शकतात. कारणे काहीही असली तरी ज्या एका गोष्टीमुळे आपले आयुष्य बर्याच अंगानी समृद्ध होऊ 
शकतं  अशी एक संधी जरी वाया गेली आणि तीच गोष्ट  सहजपणे स्वीकारलेल्या व्यक्तींना प्रगती करताना पहिले कि नकळतच पश्चाततापाची भावना निर्माण होते. या साठी जीवनाकडे सकारत्मक दृष्टीकोन ठेवून पाहता येणे गरजेचे आहे.  आपल्या व्यवहारातील एकनिष्ठता आणि कष्ट यांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा 
आपण येणाऱ्या संधीला एक आव्हान म्हणून सहज स्वीकारू आणि सफल होण्याच्या दृष्टीकोनातून सतत प्रयत्शील राहू . जीवनातील संधीला ओळखणे आणि त्यावर परिश्रम घेऊन स्वतःची प्रगती साधणे हे समाधानी आयुष्याच एक गमक म्हणावं लागेल.