Anand |
जीवनाचा खरा आनंद तुमच्यातच सामावलेला आहे त्या आनंदावर विश्वास ठेवा. जीवन उत्तम जगण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. तुमचा चांगुलपणा , आनंदी स्वभाव आणि उत्तम हेतू यातून तुम्ही जीवनात नाविन्यपूर्ण सकारात्मक बदल घडवू शकता हे जग स्वर्गाहून सुंदर करण्याची जबाबदारी आपली आहे. तुमच्या कृतीतून /व्यवहारातून तुमच्यातील चांगुलपणा प्रतीत होणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःच एक आदर्श ठरण्याचा प्रयत्न करा तुमचे जीवनावरील प्रेम तुमच्या उत्तम हेतू मध्ये, कृतीमध्ये , नवनिर्मिती मध्ये , व्यवहारामध्ये जाणवेल असे जीवन जगा . जीवन सुंदर आहे आणि जीवनात असामान्य संधी उपलब्ध आहेत. जीवनाचा प्रत्येक क्षण त्या संधींच सोन करण्यासाठी व्यतीत करा . तुम्हाला प्राप्त झालेल्या जीवनावर जीवापाड प्रेम करा आणि त्याला अधिक सुंदर करण्याचा आटोकाट प्रयत्न करा
हे जीवन सुंदर आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment