नैराश्य हे दुसरे तिसरे काही नसून एक विचार आहे. एक असा विचार ज्यावर तुम्ही ठाम
राहिलात तर तुमच्या जीवनातील एका सुंदर दिवसाच रुपांतर एका वाईट अनुभवात होत.
काळजी हाही एक विचारच आहे , असा विचार जो तुम्हाला एका कैदया प्रमाणे जखडून ठेवतो.
विश्वास आणि निर्धार हेही विचारच आहेत ज्यात तुम्ही स्वतः ला झोकून दिलत तर तुम्ही
तुमच ध्येय साध्य करू शकता. आनंद हा हि एक विचार आहे आणि तो जितका जास्त
मनात राहील तितकच जीवन सुखमय आणि परिपूर्ण होइल. आनंदी राहणं, अत्माविशास
बाळगणं, निर्धाराने पुढे जात राहणं , मनः शांती ढळू न देणं ह्या सहज अंगीकारता येणाऱ्या
गोष्टी आहेत .
जर तुमच्या मनाचा गोंधळ उडाला असेल, तर तुम्हाला कदाचित हे मुर्ख पणाच वाटेल , परंतु
स्वतः ला विचारून पहा कि तुम्हाला या गोंधळातच अडकून राहायचा आहे कि यातून बाहेर
पडून नवीन विश्वासाने आणि ताकदीने पुढे जायच आहे?
तुमचे विचारच , तुमची कृती ,तुम्हाला मिळणारी फळं (Results) आणि तुमचा जीवन प्रवाह
ठरवत असतात . आणि तुम्हाला खरच काय व्ह्यायचं आहे त्यावर तुमचे विचार अवलंबून असतात .
जरा विचार करा तुम्हाला काय व्ह्यायचं आहे?
No comments:
Post a Comment