तुमची परिस्थिती हा तुमचा परिचय नाही किंवा तुमची परिस्थिती कोणत्याही कारणांनी तुम्हाला अडवत नाही परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आणि निष्ठेने तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता . जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी
तुम्ही बदल घडवू शकता, नवीन गोष्टी निर्माण करू शकता, प्रगती साधू शकता .
केवळ , हे सोपं कि हे अवघड , योग्य कि अयोग्य, शक्य कि अश्यक्य याचा तर्क करून परिस्थिती बदलणार नाही . त्यापुढे जाऊन पाऊल टाका . तुमच्या जीवनासाठी जे काही योग्य आहे ते करा !तुम्ही एका मोठ्या लवचिक उर्जेच्या जगात जगत आहात . ती अशी उर्जा आहे जी तुम्ही तुमच्या हिताकरिता योग्य रीतीने वापरून प्रगती साधू शकता . तुमची परिस्थिती तुमचा ताबा घेण्याआधी तुम्ही परिस्थितीचा ताबा घ्या . सतत नवीन संधींचा उपयोग करून घ्या , नवीन गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास घ्या . तुमच्या परिस्थितीला कारण न ठरवता तिला प्रगतीची सुरवात समजा . तुमच्यातील "स्व" ला जागृत करून परिस्थितीवर मात करण्याची जिद्द बाळगा !
No comments:
Post a Comment