Camel |
एकदा एक अरब व्यापारी शंभर उंटांचा तांडा घेऊन चालला होता.
दिवस मावळताना तो एका गावात आला. गावातल्या मशिदीत एक
फकीर राहत होता. व्यापारी त्याच्याकडे गेला. नमस्कार करून म्हणाला,
"मशिदीबाहेर मी माझे उंट बांधले आहेत.पण एका उंटाची दोरी व खुंटी
वाटेत गहाळ झाली आहे.कृपया मला एक दोरी व खुंटी द्या !" त्यावर
फकीर म्हणाला,"बांध रे तसाच बांध उंट!" व्यापारी पुन्हा म्हणाला ,
"अहो,दोरी आणि खुंटी नाही. मग कसा बांधू?" यावर फकिर म्हणाला,
"चल मी बांधून दाखवतो उंट!" फकिर उंटाजवळ गेला. त्याच्याशेजारी
खुंटी ठोकण्याचे नाटक केले.खुंतीला एक काल्पनिक दोरी बांधल्यासारखे
केले आणी दोरीची गाठ उंटाच्या गळ्याला घट्ट बांधल्याचे नाटक केले.
उंटावर एक थाप टाकली. आंइ आश्चर्य म्हणजे उंट खाली बसला. रात्रभर
हलला नाही्. होता मोकळाच पण हलला नाही. सकाळी अरब जायला
निघाला सगळे उंट उभे राहिले.पण हा उंट उठेचना. अरबाने फकिराला
बोलावले.फकिर म्हणाला,"तसा कसा उठेल तो? त्याची दोरी सोडायला
हवी!"असे म्हणून त्याने उंटाची दोरी सोडल्याचे,खूंटी उपटल्याचे नाटक
केले. उंट लगेच उठला आणि अंग झटकून चालू लागला.
तात्पर्य : जे सवयीचे गुलाम असतात,ते स्वातंत्र्य गमावतात.... !
No comments:
Post a Comment