Saturday, May 11, 2013

बहावा

Bahawa

वीस दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध वृत्तपत्रात "बहावा फुलाला नाही , या वर्षी उशीरा  
फुलण्याचा योग आहे" असा तक्रारीचा सूर वाचायला मिळाला . परंतु आनंदाची 
गोष्ट अशी कि आज मी बहावा बहरलेला पाहिला . नेहमी प्रमाणे आक्सा बीच 
वरून परतण्याच्या वाटेवर त्याला पाहण्याचा योग आला .  बहाव्याच पिवळा रंग 
पाहून खरच मन प्रसन्न झालं  . गाडी रस्त्याच्या कडेला लावून माझ्या मोबाईल 
च्या कॅमेरात जमेल तसा त्याला टिपायचा प्रयत्न केला .  
बहावा पावसाची चाहूल घेऊन येतो असं म्हणतात . हवेत उष्मा बर्याच अंशी वाढला 
आहे आणि राज्यातील दुष्काळ ग्रस्त परिस्थिती दिवसेंदिवस भयावह रूप घेते आहे. 
बहरलेल्या  बहाव्याने मनात आशेची पालवी फुलली आहे. या वर्षी तरी पाऊस योग्य 
वेळेत सुरु होऊन , योग्य ठिकाणी , योग्य प्रमाणात पडेल अशी प्रार्थना आपण सर्वांनी 
करूया . हे सर्व जरी घडलं तरी पाण्याचे योग्य नियोजन आणि योग्य वापर करण्याची 
जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येक वर्षी मुबलक पाऊस पडेलच याची खात्री देता  येणार 
नाही परंतु योग्य नियोजन केल्यास पाण्याअभावी गाव ओस पडणार नाहीत 
आणि आयुष्य उध्वस्त होणार नाहीत हे नक्की .  


No comments:

Post a Comment