Rose |
जीवन कठीण आहे तरीही सुंदर आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका
सकारात्मक असावा कि जीवनातील अडचणी तुम्हाला निराश करू शकणार नाहीत .
आयुष्यात संकटाना पाठ फिरवणे किंवा टाळणे हा उपाय नसून योग्य तर्हेने
त्यांना समोर जाऊन त्यातून बाहेर पडणे यात खरे समाधान आहे.
जीवनात प्रश्न ज्या सातत्याने निर्माण होतील त्याही पलीकडे जाऊन त्या प्रश्नांचा
पाठपुरावा करून सोडवणे गरजेचे आहे. तुमचे कौशल्य, कष्ट , स्वभावातील
लवचिकता पणाला लावून मार्ग काढा .
अतिशय नगण्य वाटणाऱ्या छोट्या गोष्टीतला आनंदही वाया जाऊ देऊ नका .
आयुष्याच्या प्रत्येक धाग्यातील परिपूर्णता अनुभवायचा प्रयत्न करा .
प्रत्येक क्षण आयुष्यात छोटे छोटे बदल करण्यासाठी संधी देत असतो. योग्य
दिशेने उचलेलं एक पाऊलहि भविष्यातील मोठ्या बदलांना सहायक ठरते .
एकाद्या टप्प्यात आयुष्य फारच कठीण होऊन बसत यात शंका नाही पण काय
हरकत आहे? सगळी दु:ख एकत्र केली तर जीवनातील उत्तम गोष्टी आणि त्यातून
मिळणारा आनंद त्याही पेक्षा जास्त असतो , गरज असते ती जाणीव पूर्वक
जीवन जगण्याची!
No comments:
Post a Comment