Alphonso Mango |
म्हणून पुन्हा आंब्याच्या फोडी नाहीतर ताजे गरे समोर येतात . फारच झालं तर "आता जेवूनच जा असा आग्रह "झाला तर फणसाची भाजी , सांदण , पानात आंब्याचा रस, ताज्या आंब्याच लोणचं किंवा ताजा घातलेला मुरंबा , नाहीतर मग आंब्याच रायत किंवा कांदा आणि कैरी च लोणचं ,,,, यांनी ताट सजत . आमरस पुरीचा बेत म्हणजे कळसच ! बर निघताना मुलांसाठी आंबा पोळी, फणस पोळी , आंब्याच गोड लोणच असा खास खाऊ असतोच. असा हा खरा मराठमोळा आंबा आणि फणस !
पण आता तो या पलिकडे ही जाऊन अनेक विविध रुपात शहरात सजत असतो. मिल्कशेक ,पुडिंग,आईस्क्रीम ,Mango विथ क्रीम , फ्रुटसलाड आणि बरच कहि. विविध ठिकाणी "आंबा महोत्सव " साजरे होत असतात. विविध जातीच्या आंब्यांचा आस्वाद येथे घेता येतो. एक गोष्ट मात्र नक्की कि ज्यावर्षी आंबा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्या वर्षी लोक फणसा बद्दल फारस बोलताना दिसत नहित. "अहो आंब्याच्या धंद्यातूनच वेळ मिळत नाही , फणसा कडे कुठे पाहणार" अस बोलताना मी बर्याच व्यापाऱ्यांना ऐकल आहे. परंतु आंब्या प्रमाणेच फणस महोत्सवही साजरा करण्यास काय हरकत आहे?
कोकणातील या काळातील हे आंब्या फणसाचे ऐश्वर्य खर्या अर्थाने कोकणी कष्टकरी माणसाला भरभरून
आरोग्य आणि संपत्ती देऊन जाते आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाला एक आंतरिक समाधान मिळते .
आरोग्य आणि संपत्ती देऊन जाते आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाला एक आंतरिक समाधान मिळते .
परंतु आता हे ऐश्वर्य किती काळ टिकेल याची चिंता वाटू लागली आहे. ज्या जमिनीवर एके काळी आमराई होती तिथे आता बंगले , इमारती उभ्या राहताना दिसत आहेत. कोकणातही सिमेंटच जंगल उभ राहात आहे. याच पद्धतीत कोकणाचा तथाकथित विकास झाला तर या पुढे काही वर्षांनी देवगड हापूस आंबा आणि फणसाची खोटी फळे केवळ संग्रहालयात पहावी लागतील . खर्या अर्थाने या बाबत विचार करण्याची
हीच वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं ?
No comments:
Post a Comment