Bitter Guard |
कारलं किती
"तुपात तळल आणि साखरेत घोळल तरी कडू ते कडूच "हे जरी खर असलं
तरी असं कडू कारलं बहुगुणी आणि बहुउपयोगी आहे यात शंका नाही
. तुम्हाला आता
प्रश्न पडला असेल कि सोबतचे चित्र कशाचे आहे? ते कारलेच आहे. परवा भाजी साठी
कारली आणताना चुकून एक पिवळी छटा आलेलं कारलं भाजीतून आलं .
ते न चिरता
तसच ठेवलं आणि दोन दिवसात त्याने आपला रंग बदलला , तो असा!
कारलं चवीला जरी कडू असलं तरी निरोगी जीवनासाठी हे एक उत्तम
वरदान आहे
असं म्हणायला काहीच हरकत नाही . हि माहिती मी खास अशांसाठी
देते आहे ज्यांना
कारलं अजिबात आवडत नाही परंतु हे वाचल्यावर कदाचित ते
खाण्याची इच्छा त्यांना
होईल .
साखरेचे रक्तातील प्रमाण कमी करण्या साठी कारल्याचा उपयोग
होतो. कारल कमी कॅलरी
असणारी भाजी आहे. म्हणजे फक्त १७ कॅलरी प्रती १०० ग्रॅम . परंतु यात फायबर, मिनरल्स
आणि विटामिन यांचे प्रमाण चांगले असते. पचनशक्ती वाढवण्यास मदत करते आणि
बद्धकोष्ठ दूर करते.
असणारी भाजी आहे. म्हणजे फक्त १७ कॅलरी प्रती १०० ग्रॅम . परंतु यात फायबर, मिनरल्स
आणि विटामिन यांचे प्रमाण चांगले असते. पचनशक्ती वाढवण्यास मदत करते आणि
बद्धकोष्ठ दूर करते.
कारल्याचा ज्यूस योग्य प्रमाणात सेवन केल्यास मधुमेहात फायदा होतो.
कारल्याचा जूस कसा करावा :
हिरवी कारली व्यवस्थित धुवून घ्यवित. त्याचे बारीक तुकडे
करून , योग्य
प्रमाणात पाणी मिसळून मिक्सर मधून वाटून घ्यवित. लिंबाचा रस
व मीठ घालून रस ढवळून घ्यावा .
सकाळी अंशपोटी (काहीही न खातापिता ) या रसाचे सेवन करावे .
कारल्याचे अति सेवन करू नये . तसेच ज्यांना याची अलेर्जी
असेल त्यांनी याचे सेवन करू नये.
No comments:
Post a Comment