आयुष्यातल्या सर्वोत्तम गोष्टींच वर्णन तुम्ही कस कराल? आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी
ह्या अमर्याद असतात . उदाहरणच द्यायच झाल तर आपली कल्पनाशक्ती … ती कधीच संपत
नाही उलट ती आपण जितकी जास्त वापरू तितकी तिची ताकद आणि व्याप्ती वाढतच जाते .
तसच प्रेमाचही आहे , तुम्ही जितक जास्त निरपेक्ष प्रेम द्याल तितक जास्त ते तुमच्या आयुष्यातही
वाढत जाईल . प्रामाणिक पणाने आयुष्य जगलात तर तुमची प्रामाणिक वृत्ती वाढतच रहिल.
इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात आनंदाला पारावर उरणार नाही .
या प्रमाणेच धैर्य , सभ्यता ,दया , शांती , विश्वास , मैत्री यांचाही विचार आपण करू शकतो.
जितकी जास्त निष्ठा तुम्ही या सर्व गोष्टींवर ठेवाल तितकीच जास्त उत्तम उर्जा तुमचे जीवन
व्यापून टाकेल .
आयुष्यात आपण बरेच वेळा या सर्व गोष्टीन कडे सहज दुर्लक्ष करतो किंवा त्यांना मूर्ख पणाचे
समजतो परंतु आयुष्यातल्या या उत्तम गोष्टी अमर्याद आहेत . त्या कधीही नष्ट होत नाहीत
किंवा संपत नहित. तुम्ही जितक्या उत्तम प्रकारे त्यांच्यासह जीवन जगाल , तितक्याच
त्या वाढत जाणार आहेत.
खरतर आयुष्यातल्या उत्तम गोष्टी ह्या महागड्या नसून सहज , सोप्या आणि सुखद असतात
हे नक्कि.
खरतर आयुष्यातल्या उत्तम गोष्टी ह्या महागड्या नसून सहज , सोप्या आणि सुखद असतात
ReplyDeleteहे नक्कि.